शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मंगळ यानाची रंगीत तालीम फत्ते !

By admin | Updated: September 23, 2014 05:31 IST

येत्या बुधवारी मंगळ यान मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करणार आहे. त्यासाठी यानाला रेटा देणारे ४४० न्यूटन क्षमतेचे मुख्य इंजिन - ‘लिक्विड अ‍ॅपोजी मोटार’पूर्ण क्षमतेने सुरू होणे महत्त्वाचे

चेन्नई : गेल्या ५ नोव्हेंबरला श्रीहरीकोटा अंतराळ तळावरून प्रक्षेपित केलेल्या ‘मार्स आॅर्बिटर मिशन’चे अर्थात मंगळ यानाच्या गेले ३०० दिवस सुप्तावस्थेत असलेल्या मुख्य इंजिनाचे पुनर्प्रज्वलन करण्याची अत्यंत महत्त्वाची चाचणी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) वैज्ञानिकांनी सोमवारी फत्ते केली.येत्या बुधवारी मंगळ यान मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश करणार आहे. त्यासाठी यानाला रेटा देणारे ४४० न्यूटन क्षमतेचे मुख्य इंजिन - ‘लिक्विड अ‍ॅपोजी मोटार’ - पूर्ण क्षमतेने सुरू होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सुप्तावस्थेत असलेले हे इंजिन सोमवारी दुपारी २.३० वाजता ३.९६८ सेकंदांसाठी पुन्हा प्रज्वलित करून ते ठीकपणे सुरू होते की नाही याची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे ‘इस्रो’ने जाहीर केले.सोमवारी करायच्या या चाचणीचे टेलीसंदेश बंगळुरू येथील मुख्य नियंत्रण केंद्रातून यानाला गेल्या आठवड्यातच धाडण्यात आले होते. यानाने त्याचे तंतोतंत पालन केले व मुख्य इंजिन सुमारे चार सेकंदांसाठी प्रज्वलित होऊन आपणहून पुन्हा बंद झाले. हे यान सध्या पृथ्वीपासून २२ कोटी किमी अंतरावर असल्याने दिलेल्या संकेतानुसार सुप्तावस्थेत असलेले इंजिन खरोखरीच पुन्हा सुरू झाले याची माहिती वैज्ञानिकांपर्यंत पोहोचण्यास १२ मिनिटांहून थोडा अधिक वेळ लागला. इंजिनाच्या प्रज्वलनाने यान त्याचा नियत मार्ग सोडून सुमारे १०० किमी बाहेर गेले, पण ते अल्पावधीत पुन्हा ठरलेल्या मार्गावर आले. आता बुधवारी हे इंजिन २४ मिनिटांसाठी चालविले जाईल व त्याच्या रेट्याने यान मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्र्षण कक्षेत प्रवेश करेल. ते कामही फत्ते झाले की मंगळावर यान पाठविणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत मानाचे स्थान पटकावेल. बुधवारच्या या ऐतिहासिक क्षणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू येथील मुख्य नियंत्रण केंद्रात जातीने हजर राहून वैज्ञानिकांचा हुरूप वाढविणार आहेत. (वृत्तसंस्था)