शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी सांभाळून बोला

By admin | Updated: October 12, 2014 01:24 IST

निवडणूक आयोगाने भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर ठेवला असून, भविष्यात गडकरी यांनी सांभाळून बोलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : ‘येत्या काही दिवसांत तुमच्या नशिबी ‘लक्ष्मीदर्शना’चा योग आहे. मिळेल ते खा-प्या, देतील ते ठेवून घ्या. येणा:या लक्ष्मीला नाही म्हणून नका,’ अशा आशयाचे मतदारांना प्रलोभन स्वीकारून मतदान करण्याचे विधान प्रचार सभेत करून निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य बिघडविल्याचा ठपका निवडणूक आयोगाने भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर ठेवला असून, भविष्यात गडकरी यांनी सांभाळून बोलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
निलंगा येथील प्रचारसभेत 5 ऑक्टोबर रोजी गडकरी यांनी केलेले उपयरुक्त आक्षेपार्ह विधान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे, असे प्रथमदर्शनी वाटल्याने आयोगाने गडकरी यांना नोटिस काढली होती. त्यावर गडकरी यांनी केलेला खुलासा विचारात घेऊन आणि त्या भाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डिग पुन्हा एकदा पाहून गडकरी यांच्या या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करणारा निकाल शनिवारी दिला.
आयोग म्हणतो की, भाषणात असे वक्तव्य करताना गडकरी यांचा अंतस्थ हेतू काहीही असला तरी त्यामुळे निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य आणि शुचिता बिघडली हे नक्की.
गडकरी यांनी खुलासा करताना म्हटले होते की, कोणत्याही मार्गाने मतदारांना प्रलोभने दाखविण्याच्या प्रयत्नांची निंदा करणो हाच माङया भाषणाचा मुख्य रोख होता. हे मी विनोदी व वक्रोक्तीपूर्ण शैलीत केले. हल्ली सार्वजनिक जीवनातून विनोदबुद्धी हरवत चालली आहे, हेही मला आवजरून सांगावेसे वाटते. त्यामुळे ‘येणा:या लक्ष्मीला नाकारू’ नका, हे माङो विनोदाने केलेले विधान त्याहूनही अधिक गांभीर्याने केलेल्या ‘कितीही प्रलोभने आली तरी महाराष्ट्राच्या हितासाठी मतदान करा,’ या विधानासोबत विचारात घेतले तर त्यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. उलट प्रलोभनांना बळी पडू नका, हेच मला मतदारांच्या मनावर बिंबवायचे होते.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्निवडणूक प्रक्रिया विशुद्ध राहावी व  त्यात सर्वाना समान संधी मिळावी, यासाठी आचारसंहिता तयार केली गेली आहे. त्यामुळे तिचे पालन गांभीर्याने व्हायला हवे. मतदारांना दाखविली जाणारी प्रलोभने हा प्रचारसभेत थट्टेवारी नेण्याचा विषय नाही. 
 
च्त्यामुळे ही आक्षेपार्ह विधाने करून तुम्ही प्रत्यक्षात मतदारांना प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन करीत होतात, हे मान्य करता येण्यासारखे नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे गडकरींचा खुलासा अमान्य करण्यात आला.