शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बाबरी आणि गुजरातचा बदला घेऊ!

By admin | Updated: May 22, 2016 04:19 IST

‘बाबरी मशीद आणि गुजरात, काश्मीर व मुझफ्फरनगरमध्ये मारल्या गेलेल्या मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी आम्ही भारतात येऊ’ अशी धमकी ‘इसिस’ (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेने एका व्हिडीओमार्फत दिली आहे.

नवी दिल्ली : ‘बाबरी मशीद आणि गुजरात, काश्मीर व मुझफ्फरनगरमध्ये मारल्या गेलेल्या मुस्लिमांचा बदला घेण्यासाठी आम्ही भारतात येऊ’ अशी धमकी ‘इसिस’ (इस्लामिक स्टेट) या दहशतवादी संघटनेने एका व्हिडीओमार्फत दिली आहे.दोन वर्षांपूर्वी ‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी भारतातून सिरियात गेलेल्या फवाद शेख या दहशतवाद्याचा चेहरा या व्हिडीओत स्पष्ट दिसत असून, त्यानेच भारताला धमकी दिली आहे.‘इसिस’तर्फे अरेबिक भाषेतील २२ मिनिटांचा हा व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये भारतातून इसिसमध्ये सहभागी झालेल्या काही जिहादी तरुणांचे चेहरे दिसत असून, ठाण्यातील इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असणाऱ्या फवाद शेखचाही त्यात समावेश आहे. इराक व सिरियामध्ये हिंसाचार करणाऱ्या काही जिहादींची मुलाखत या व्हिडीओत दाखवण्यात आली असून, त्यातूनच भारतात घातपात करण्याची धमकी दिली आहे.२०१४ साली कल्याणमधील चार तरुण ‘इसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी धार्मिक यात्रेच्या नावाखाली देशातून बाहेर पडले व तिथूनच पुढे सिरियामध्ये गेले होते. त्यापैकीच एक असलेला इंजिनीअरिंगचा विद्यार्थी फवाद शेख आता इसिसमधील एक दहशतवादी बनला आहे. मात्र या व्हिडीओत त्याने आपली ओळख अबू अम्र अल हिंदी अशी करून दिली असून, त्याने भारत आणि दक्षिण आशियातील देशांना धमकी दिली आहे, तसेच त्याने त्याच्यासोबत सिरियात आलेल्या कल्याणमधील आणखी एक सहकारी शाहिम टंकी याला श्रद्धांजलीही वाहिली आहे. रक्का येथील बॉम्बहल्ल्यात टंकीचा मृत्यू झाला होता. कल्याणमधून गेलेल्या चार तरुणांपैकी एक असलेला आरीब माजीद भारतात परतला असून, तो सध्या एनआयएच्या कोठडीत चौकशीस सामोरा जात आहे. (वृत्तसंस्था)‘आम्ही लवकरच परत येऊ; पण आमच्या हातात तलवार असेल. बाबरी मशिदीचा सूड घेण्यासाठी आणि काश्मीर, गोध्रा व मुझफ्फरनगरमधील मुस्लिमांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आम्ही येऊ. भारतातील हे हल्ले स्थानिक जिहादींकडूनच इसिस घडवून आणेन, असे शेखने या व्हिडिओत म्हटले आहे. इसिसच्या या व्हिडिओत शेखसह इतर काही दहशतवाद्यांनीही धमकीवजा संदेश दिले आहेत.