शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कराचा ढीग

By admin | Updated: August 30, 2016 06:38 IST

नरेंद्र मोदी सरकारने कर वसुलीसाठी प्रयत्न करूनही गेल्या काही वर्षांमध्ये कर थकबाकीचा ढीग चढत असल्याची माहिती समोर आली आहे.

हरीश गुप्ता,  नवी दिल्ली नरेंद्र मोदी सरकारने कर वसुलीसाठी प्रयत्न करूनही गेल्या काही वर्षांमध्ये कर थकबाकीचा ढीग चढत असल्याची माहिती समोर आली आहे. ३१ मार्च २०१६ अखेर थकीत कराचा आकडा साडेसहा लाख कोटींवर पोहोचला आहे. तसेच पाच वर्षांत प्राप्तीकर व कॉर्पोरेट कराच्या थकबाकीची रक्कम तिप्पट झाली. ‘लोकमत’ने माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागानेच ही माहिती दिली आहे.वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार, ३१ मार्च २०१६ रोजी थकीत उत्पन्न कराचा आकडा ३ लाख १७ हजार ३४६ कोटी रुपये आणि कंपनी कराच्या थकबाकीचा आकडा ३ लाख ५० हजार ५१० कोटी रुपयांवर पोहोचला. म्हणजेच ही थकबाकी ६ लाख ६७ हजार ८५६ कोटी रुपये आहे. आयकर आयुक्त (अपील्स), इन्कम टॅक्स अ‍ॅपिलेट ट्रायब्युनल्स, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील संबंधित प्रलंबित प्रकरणामुळे ५.६५ लाख कोटींहून अधिक रक्कम अडकल्याची माहितीही उघडकीस आली आहे. डिफॉल्टर्सची नावेही जाहीर करणार कर चोरी करणाऱ्यांची नावे जाहीर करण्याच्या आपल्या धोरणानुसार आयकर विभाग आता जुन्या कोट्यधीश डिफॉल्टर्सची नावे जाहीर करणार आहे. ज्यांच्याकडे जुना एक कोटी रुपयांचा अथवा त्यापेक्षा अधिक कर थकलेला आहे, अशा नागरिकांची नावे जाहीर करण्यात येतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, याबाबतचा प्रस्ताव सीबीडीटीकडे (केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड) देण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर अशा कर चोरी करणारांची नावे प्रमुख दैनिकांतून प्रकाशित करण्यात येतील, तर विभागाच्या वेबपोर्टलवरही ही नावे टाकण्यात येतील. विविध अपील प्राधिकरणे, लवादाकडे प्रलंबित असलेल्या वादात २०१४-१५मध्ये ४.६५ लाख कोटी रुपये अडकून पडले होते. तो आकडा २०१५-१६मध्ये ५.६५ लाख कोटींवर गेला. या आकडेवारीवरून थकीत कर व अपील प्राधिकरण, लवादाकडे जाण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसते. थकीत करवसुलीचा वेग वाढविण्यासाठी, तसेच कायदेशीर दाव्याचे प्रमाण कमी करण्यासाठी नजीकच्या काळात ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना आणण्याचा इरादा नाही, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.टक्केवारीच्या दृष्टीने २०१४-१५च्या तुलनेत २०१५-१६मध्ये करवसुली करण्याचे सरकारचे प्रयत्न यशस्वी झालेत का, या प्रश्नावर अशा प्रकारची माहिती या कार्यालयात ठेवली जात नाही, थकीत कराशी संबंधित प्रकरणनिहाय नोंद नसल्याने याबाबत माहिती देणे शक्य नाही, असे महसूल विभागाने म्हटले आहे.