स्वाईन फ्लू हायकोर्टात
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
नागपूर : स्वाईन फ्लू या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे व्यावसायिक अनिल आग्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. आग्रे यांची डेंग्यू आजारासंदर्भातील जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात हा अर्ज करून याचिकेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. अर्जात महानगरपालिका, मेडिकल व मेयो रुग्णालयाला प्रतिवादी करण्यात आले आहे. स्वाईन फ्लूचा प्रसार थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. परंतु प्रशासन वेगवान पावले उचलत नसल्यामुळे स्वाईन फ्लूने अनेकांचे बळी घेतले, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. ताज्या आकडेवारीनुसार नागपूर विभागात स्वाईन फ्लूने २२ रुग्णांचे बळी घेतले आहेत.