शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पती असूनही स्वराज कौशल करत नाहीत सुषमा यांना फॉलो

By admin | Updated: February 20, 2017 09:27 IST

सुषमा यांना त्यांचे पती ट्विटरवर फॉलो करत नाही, यावरुन एका ट्विटर यूजरने कौशल यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांचे उत्तर वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 20 - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या नागरिकांकडून ट्विटरवर मांडल्या जाणा-या समस्या सोडवण्यासाठी ओळखल्या जातात.  लोकांना मदत करण्यासाठी सुषमा स्वराज सोशल मीडियाचा चांगला उपयोग करतात, हे सर्वांनाच माहिती आहे. 
 
याद्वारे स्वराज परदेशात फसलेल्या नागरिकांना किंवा पासपोर्ट न मिळणा-यांना मदत करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी पती कौशल यांच्यासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर केला. मात्र, सुषमा यांना त्यांचे पती ट्विटरवर फॉलो करत नाही, ही वेगळीच गोष्ट. यावर एका ट्विटर यूजरने कौशल यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांचे उत्तर वाचून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.  
 
अंकू त्यागी नावाच्या ट्विटर यूजरने स्वराज कौशल यांचा विचारले की, सर तुम्ही सुषमा स्वराज यांना ट्विटरवर फॉलो का करत नाही ?. यावर कौशल यांनी उत्तर दिले की, कारण मी लीबिया किंवा येमेनमध्ये फसलेलो नाही. कौशल यांच्या या उत्तरावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
 
एका यूजरने लिहिले की, आनंदी वैवाहिक जीवनासाठी, सर्व जोडप्यांनी एकमेकांना फेसबुक आणि ट्विटवर ब्लॉक केले पाहिजे. 
यापूर्वी एका युजरने कौशल यांना 'तुम्ही सुषमा स्वराज यांनी शेवटचे कधी भेटला होतात?', असा प्रश्न केला होता. यावेळी कौशल यांनी त्याला असे उत्तर दिले की त्याची बोलतीच बंद झाली. 'तुम्ही आरटीआय एक्टिव्हिस्ट आहात का?', असे उत्तर देऊन कौशल यांनी त्याला जशास तसे उत्तर दिले. 
 
एका व्यक्तीने स्वराज दाम्पत्याची स्तुती करत म्हटले होते की, 'तुमच्या दोघांकडेही चांगली विनोदबुद्धी आहे.  तुम्ही दोघंही फार धम्माल करत असाल'. यावर 'गेल्या 42 वर्षांपासून ही कॉमेडी सुरू आहे', असे उत्तर कौशल यांनी दिले. लक्ष्य अडवाणीने विचारले होते की, 'सर मी तुमचा खूप आदर करतो. बस इतके जाणून घ्यायचे होते की सर्व ठिक आहे ना? सुषमा स्वराज आज ट्विटरवर सक्रिय नाहीत. सर्व ठिक आहे अशी आशा करतो'. यावर 'जर त्या ट्विट करत नाहीत याचा अर्थ सर्व ठिक आहे', असे मजेशीर उत्तर कौशल यांनी लक्ष्यला दिले.