शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी काढाल तर कॉलेजमधून निलंबन

By admin | Updated: January 11, 2017 01:02 IST

दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाउसमध्ये नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या परिसरात विद्यार्थींनींना आता सेल्फी घेता येणार नाही.

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाउसमध्ये नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या परिसरात विद्यार्थींनींना आता सेल्फी घेता येणार नाही. एवढेच काय, त्यांना कंगव्याने केसही विंचरता येणार नाहीत. असे केल्यास निलंबित करण्याचा इशाराच प्रशासनाने दिला. मिरांडा हाउसच्या विद्यार्थीनी रविवारी स्कूल आॅफ ओपन लर्निंगमध्ये (एसओएल) गेल्या असता त्यांना ही नोटीस दिसली. सेल्फीसारखे प्रकार म्हणजे वेळेचा दुरुपयोग असल्याचे या नोटिशीत म्हटले आहे. दरम्यान, येथील क्रांतिकारी विद्यार्थी संघटनेने हा आदेश महिला विरोधी असल्याचे म्हटले आहे. याविरुद्ध आपण महिला आयोगाकडे धाव घेणार असल्याचेही या संघटनेने स्पष्ट केले आहे. नोटिशीत म्हटले आहे की, अनेक विद्यार्थिनी या परिसरात सेल्फी घेतात, केस विंचरतात व मॉडेलिंग करत असल्याचे दिसून आले आहे. हा वेळेचा दुरुपयोग आहे. महाविद्यालय याला परवानगी देणार नाही. एखाद्या विद्यार्थीनीने नियमभंग केल्यास तिला त्या दिवसासाठी निलंबित करण्यात येईल आणि महाविद्यालय परिसराच्या बाहेर काढण्यात येईल. मिरांडा हाऊस आणि येथील शिक्षक नेहमीच आपल्या उच्च शिक्षणासाठी संघर्षरत राहिलेले आहेत. आम्हाला आशा आहे की, विद्यार्थीनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करतील, असेही यात म्हटले आहे. प्राचार्यांनीही दिला दुजोरा मिरांडा हाऊस महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रतिभा जॉली यांनी या नोटिशीबाबत दुजोरा दिला आहे. सुरक्षेबाबत अंतर्गत चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कारण, या परिसरात विद्यार्थीनी नेहमीच सेल्फी घेत असल्याचे दिसून येत आहे. एसओएलचे संचालक सी.एस. दुबे यांनी सांगितले की, या नोटिशीबाबत काही माहिती नाही. काय आहे मिरांडा हाउस? मिरांडा हाउस हे दिल्ली विद्यापीठातील ‘रेसिडेन्शियल कॉलेज फॉर वूमेन’ आहे. १९४८ मध्ये याची स्थापना झालेली आहे. दिल्ली विद्यापीठात महिलांच्या ज्या प्रमुख इन्स्टिट्यूट आहेत त्यापैकी ही एक इन्स्टिट्यूट आहे.