नवी दिल्ली : एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कारागृहात बंद असलेल्या आसारामबापू यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी एका वैद्यकीय पथकाची स्थापना करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला आज दिले आहेत. त्यांच्या जामीन याचिकेवर, जोर्पयत सर्व साक्षीदार आपले बयाण नोंदवित नाहीत तोर्पयत निकाल देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.