शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दलितांवरील बहिष्कार संपविण्याचा आदेश अशक्य सुप्रीम कोर्ट : न्यायालयीन आदेश निष्प्रभ ठरेल

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

नवी दिल्ली : दलित समुदायावरील कथित सामाजिक बहिष्कार न्यायालयाच्या आदेशाद्वारे संपवता येणे शक्य नाही, असे सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. हरियाणातील मिर्चपूर या हिंसाचारग्रस्त गावातील दलित समुदायावरील बहिष्कार संपविण्याचा आदेश देता येणार नाही कारण असा आदेश निष्प्रभ ठरेल, असे एम. बी. लोकूर आणि यू.यू. ललित या न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : दलित समुदायावरील कथित सामाजिक बहिष्कार न्यायालयाच्या आदेशाद्वारे संपवता येणे शक्य नाही, असे सवार्ेच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. हरियाणातील मिर्चपूर या हिंसाचारग्रस्त गावातील दलित समुदायावरील बहिष्कार संपविण्याचा आदेश देता येणार नाही कारण असा आदेश निष्प्रभ ठरेल, असे एम. बी. लोकूर आणि यू.यू. ललित या न्यायमूर्तीद्वयांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
सामाजिक बहिष्कार संपविण्यासाठी काय तोडगा असू शकतो? दलितांवरील बहिष्कार संपवा असे न्यायालय सांगू शकत नाही. तसा आदेश दिला तरी त्याचा परिणाम होणार नाही, असे न्यायाधीशांनी एका जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सांगितले.
रोहतक जिल्ह्यातील मिर्चपूर येथील दलित समुदायाचे पुनर्वसन करण्यासह त्यांच्यासाठी वेगळे ठिकाण देण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली होती. २०१० मध्ये जात समुदायाने या गावातील दलित वृद्ध आणि त्याच्या अपंग मुलीची हत्या केली होती. हरियाणा सरकारने या प्रकरणी चौकशीसाठी न्या. इक्बाल सिंग यांच्या आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाकडून अहवाल मिळाला काय याची माहिती देण्याचा आदेश खंडपीठाने सरकारी वकिलांना दिला.
दलित समुदायाची बाजू मांडताना वकील कोलिन गोनसाल्वेस म्हणाले की, या प्रकरणी जाट समुदायातील काहींना दोषी ठरविण्यात आल्यामुळे दलित समुदाय कायम भीतीच्या सावटात वावरत आहे. काहींनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून खटल्याचा निकाल प्रलंबित आहे. त्यावर सरकारी वकील म्हणाले की, या गावात २०१० पासून सीआरपीएफची एक तुकडी कायम तैनात असून दलितांना संरक्षण दिले जात आहे.
-------------------
कुत्रा भुंकला म्हणून भांडण
दलित वस्तीतून जात असलेल्या जाट समुदायाच्या एका गटावर कुत्रा भुंकला असता एका जाट युवकाने त्याला दगड मारल्याने वाद निर्माण झाला. दोन दिवसानंतर २१ एप्रिल २०१० रोजी जाट समुदायाने घराला आग लावली असता ताराचंद हा ७० वर्षीय वृद्ध आणि त्याच्या अपंग मुलीला घराबाहेर पडता आले नव्हते, होरपळून त्यांचा मृत्यू झाला.
-------------------
समाजाला कलंक
याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ही हत्या नसल्याचा निर्णय दिल्याकडे तत्कालीन काँग्रेस सरकारने लक्ष वेधल्यानंतर सवार्ेच्च न्यायालयाने संताप व्यक्त करीत हा समाजाला कलंक असल्याचे स्पष्ट केले. दिल्ली कनिष्ठ न्यायालयाने ९७ पैकी ८२ आरोपींना निदार्ेष सोडले तर १५ जणांना घराला आग लावल्याबद्दल दोषी ठरविले असून तिघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ५ जणांना पाच ते सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ७ जण सध्या वर्षभरासाठी सुटीवर मुक्त आहेत.