शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माओवाद्यांना युरोपातून पाठबळ

By admin | Updated: July 16, 2014 09:19 IST

भारतातील माओवादी कारवायांना जर्मनी, फ्रान्स, हॉलंड आणि इटलीसह इतरही काही युरोपीय देशांमधील संघटनांकडून मदत मिळत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे.

गृहमंत्रालयाची माहिती : राजनैतिक पातळीवर संबंधित देशांकडे विषय नेणारनवी दिल्ली: भारतातील माओवादी कारवायांना जर्मनी, फ्रान्स, हॉलंड आणि इटलीसह इतरही काही युरोपीय देशांमधील संघटनांकडून मदत मिळत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे असून हा विषय संबंधित देशांकडे राजनैतिक पातळीवर उपस्थित केला जात आहे.परदेशातून वित्तीय साह्य मिळणाऱ्या ‘ग्रानपीस’सारख्या काही स्वयंसेवी संघटना भारताच्या आर्थिक विकासात खोडा घालण्यासाठी आंदोलने करीत असल्याच्या गुप्तहेर संघटनांनी दिलेल्या अहवालाच्या पाठोपाठ ही माहिती बाहेर आली आहे. गृहमंत्रालयाकडून मंगळवारी संसदेत असे सांगण्यात आले की, भारतीय माओवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे (सीपीआय-माओवादी) भारत सरकारविरुद्ध पुकारण्यात आलेल्या तथाकथित जनसंघर्षाला (पीपल्स वॉर) जर्मनी, फ्रान्स, हॉलंड, तुर्कस्तान व इटली या सारख्या युरोपीय देशांमधील काही फुटकळ संघटनांकडूनही मदत मिळत आहे.गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती देताना असेही सांगितले की, भारतातील ‘सीपीआय-माओवादी पक्षाचे फिलिपीन्स आणि तुर्कस्तानमधील माओवादी संघटनांशी घनिष्ट संबंध आहेत. तसेच बेल्जियम आणि जर्मनीमध्ये झालेल्या परिषदा व चर्चासत्रांमध्ये भारतातील डाव्या अतिरेकी गटांचे प्रतिनिधी सहभागी झाल्याचीही माहिती आहे.दक्षिण आशियाई देशांमधील माओवादी संघटनांचा महासंघ असलेल्या ‘कोआॅर्डिनेशन कमिटी आॅफ माओईस्ट पार्टीज अ‍ॅण्ड आॅर्गनायझेशन्स आॅफ साऊथ एशिया’ ची भारतातील सीपीआय-माओवादी सदस्य असल्याचेही मंत्रालयाने संसदेस सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)परदेशातून पैसाही मिळत असण्याची दाट शक्यता४गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार फिलिपीन्समधील कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी सीपीआय-माओवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना २००५ व २०११ मध्ये प्रशिक्षण दिल्याचीही माहिती मिळली आहे. ४भारतातील नक्षली चळवळ ही देशातच उदयास आलेली फुटीरवादी चळवळ असल्याचे सरकारचे आजवर म्हणणे होते. मात्र माओवाद्यांविरुद्ध केलेल्या विविध कारवायांमध्ये त्यांच्याकडून परदेशी बनावटीची शस्त्रे व दारुगोळा हस्तगत झालेला असल्याने ही संघटना जगातील विविध ठिकाणांहून शस्त्रे मिळवीत असल्याचे संकेत मिळतात.४याशिवाय सीपीआय-माओवादी पक्षाशी संबंधित काही संघटनांना परदेशातून पैसाही मिळत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून गरज पडेल तेव्हा कारवाई केली जात आहे. ४अशा बाबी निदर्शनास आल्यावर गृहमंत्रालय त्या परराष्ट्र मंत्रालयास कळविते व ते मंत्रालय हा विषय संबंधित देशांकडे राजनैतिक पातळीवर उपस्थित करीत असते, असेही रिजिजू यांनी सांगितले.