शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अणेंना पाठिंबा म्हणजे खुन्याची पाठ मुख्य न्यायाधीशाने थोपटण्याचा प्रकार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: December 9, 2015 09:57 IST

स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-या भाजप आणि राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणेंवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ९ -  स्वतंत्र विदर्भाची मागणी करणा-या भाजप आणि राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणेंवर  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी श्रीहरी अणेंना दिलेल्या पाठिंब्यावर एखाद्या खुन्याची पाठ मुख्य न्यायाधीशाने जाहीरपणे थोपटण्यासारखाच हा प्रकार असल्याचे सामनाने आपल्या अग्रलेखात म्हटले आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्र राज्य तोडण्याची भाषा सुरु झाली आहे व अशा तोडफोड प्रवृत्तीच्या मागे उभा रहाण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. 

पाच पती असतानाही भरदरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला. तसे आता महाराष्ट्राच्या अखंडतेबाबत सुरु आहे. विदर्भाच्या हाती संपूर्ण सत्ता असतानाही महाराष्ट्राच्या अखंडतेचा कासोटा फेडण्यासाठी भाजपवाल्यांचे हात शिवशिवत आहेत अशा शब्दात भाजपच्या स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा समाचार घेण्यात आला आहे. 
श्रीहरी अणे यांचे समर्थन करणारे आमदार आणि मंत्री विनोद तावडे यांनाही अग्रलेखातून खडेबोल सुनावण्यात आले आहेत. श्रीहरी अणेंमुळेच शिवतीर्थावर दसरा मेळावा झाला असे तावडे म्हणतात. तावडे यांच्यासारख्यांनी मुंबईतून निवडून येऊन हे बोलावे यास काय म्हणावे ? मुंबईच्या हुतात्म्यांचा अपमान करण्याचा हा प्रकार आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.