शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
6
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
7
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
8
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
9
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
10
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
11
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
12
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
13
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
14
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
15
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
16
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
17
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
18
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
19
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
20
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS

संडे पान ६ सोमवारसाठी क्राईम स्टोरी - बार्देश

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

प्रकाश धुमाळ

प्रकाश धुमाळ
बार्देस, प्रकाश धुमाळ : सध्या बार्देस तालुका हा जुगार आणि ड्रग्स, अमली पदार्थ, वेश्या व्यवसाय अशा विविध अनैतिक समस्यांमध्ये गुरफटला आहे. अशा या भयंकर गुन्हेगारीत शालेय विद्यार्थी, कॉलेजकुमारांबरोबरच तरुण पिढीही सापडली आहे. ऐशोआराम करण्यासाठी ज्या वेळी पैसे नसतात, त्या वेळी हे नवयुवक चोर्‍या करण्यासाठी मागे पुढे पाहत नसल्याचेही कित्येक प्रकरणांमध्ये उघड झाले आहे. कित्येक प्रकरणांचा तपास लावण्यास पोलिसांना अपयश येत असल्याने हा एक चिंतेचा विषय बनला आहे.
अनैतिक घडामोडीत काहींचे खून, दोन गटांत मारामार्‍या होऊन त्यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बार्देस तालुका हा समुद्रकिनारा आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेला असल्याने या तालुक्यात देशी-विदेशी लोकांचा जास्त भरणा असतो. स्थानिक पर्यटकही मोठ्या संख्येने येतात त्यामुळे कळंगुट, कांदोळी, हणजूण, वागातोर यांबरोबर पेडणेतील आश्वे-मांद्रे, हरमल व केरी हे किनारे देशी, तसेच विदेशी ड्रग्स पेडलर्सनी काबिज केले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
रेस्टॉरंट, क्लब, शॅकवर कब्जा करून त्यांनी किनार्‍यावरील झगमगत्या रात्रीत हा धंदा उघडपणे चालविला आहे. आजपर्यंत ड्रग्स व्यवहारातून अनेकवेळा दोन गटांत गँगवॉर झाले आहेत. त्यातून आतापर्यंत गनियू आदेसोये, चुक्केबुका हेनरी इजिमकॉय व ओबोदो सिमोअन या नायजेरियनांची आणि सागर साळगावकर आणि संप्रित मालवणकर या स्थानिक युवकांचे खून झाले आहेत.
उत्तर गोव्यातील कांदोळी, कळंगुट ते हरमल केरीपर्यंतच्या किनारप˜्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा व्यवहार होत आहे. या व्यवहारामध्ये नायजेरियन आणि इस्रायली नागरिक गुंतलेले आहेत. काही स्थानिक गट व इटालियनही या अनधिकृत धंद्यात उतरल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. पर्रा येथे ३० ऑक्टोबर २०१३ मध्ये एका स्थानिक गॅँगकडून ओबोदो सिमोअन या नायजेरियन नागरिकाचा खून प्रकरण गाजले होते. स्थानिक व नायजेरियनामध्ये सुरू असलेल्या ड्रग्स व्यवहारातील वादातून हे प्रकरण घडले होते. हा धंदा काबिज करण्याच्या चढाओढीचे पर्यवसान ओबोदोच्या खुनात झाले होते. हा खून बर्लेस तुंडे या नायजेरियनने केल्याचा संशय होता. अताला आणि दुडू या ड्रग्स माफियांचे बार्देसच्या किनार्‍यावर वर्चस्व होते.
विद्यार्थी व्हीसावर आलेले बहुतेक नायजेरियन नागरिक या धंद्याकडे वळले आहेत. स्थानिकांचा आधार घेऊन गोव्यात नायजेरियन ड्रग्सचा धंदा करीत असल्याचा सबळ पुरावा पोलीस खात्याकडे आहे. पासपोर्ट व व्हीसाशिवाय राज्यात अवैधरीत्या वास्तव्य करणार्‍या नायजेरियन व इतर विदेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली. म्हणजे त्यांना राज्यात बिनधास्तपणे वावर करणे सोपे होते. अशी कित्येक प्रकरणे न्यायालयात आहेत. नायजेरियन खून प्रकरणानंतर पर्रा व पर्वरी येथे महामार्गावर हैदोस घालणार्‍या व पोलिसांनी अटक केलेल्या नायजेरियन संशयितापैकी ४५ जणांकडे पासपोर्ट किंवा व्हीसा नव्हता असे असूनही त्यांना राज्यात वावरण्यास रान मोकळे आहे. त्या वेळी या नायजेरियनना माघारी पाठविण्याची सर्व राजकारणी व पोलीस अधिकार्‍यांबरोबरच नागरिकांची मागणी होती; परंतु असा कायदाच आपल्याकडे अस्तित्वात नसल्याने संशयित नायजेरियन अद्याप राज्यातच आहेत.
प्रमुख ड्रग्स पेडलर्स हणजूण, शिवोली, कळंगुट व हरमल, मांद्रे भागांत वास्तव्य करून आहेत. चरस कोकेन, गांजा, हेरॉईनबरोबरच एलएसडीसारख्या ड्रग्सची विक्री मोठ्या प्रमाणात किनारी तसेच बार्देस, पेडणे बरोबरच राज्यातील इतर भागांत होत आहे. बार्देस तालुक्यातील कॉलेज आवारातही सुरक्षारक्षक व विद्यार्थ्यांकडून पोलिसांनी अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. यातून युवा पिढीही या व्यवहाराकडे वळली गेली असल्याचा पुरावा पोलिसांकडे आहे. तरीही ड्रग्स विक्री मोडीत काढण्यासाठी हवी तशी संबंधितांकडून कारवाई होत नाही.
---------
चौकट
वैश्या व्यवसाय चिंताजनक
मिळालेल्या माहितीनुसार, बार्देस तालुक्यातील कळंगुट, कांदोळी, हणजूण, वागातोर येथील अलिशान हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या व्यवसायात २०-२२- २५ वयोगटांतील तरुणी गुरफटल्या आहेत. मुंबई, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा ठिकाणांहून त्या आणल्या जातात. स्थानिक हॉटेलचालकही जादा पैशाच्या हव्यासापोटी वैश्या व्यवसायासाठी भाड्याने खोल्या देवून त्यांचे समर्थन करत आहेत. बार्देस तालुक्यातील पोलिसांना याची माहिती असतानाही त्यांची तात्पुरती धरपकड होते. मात्र, पुढे त्याचा पाठपुरावा होत नसल्याने त्यांचे आयते फावते. त्यामुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे.
पॉईंटर
सरकारचा वचक गरजेचा
0 गोवा हा समुद्रकिनारे, मंदिरे, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेले राज्य असल्याने या राज्यामध्ये जसे चांगल्या भावनेने लोक येतात, तसेच आपली वासना पूर्ण करण्यासाठी व मौजमजा करण्यासाठीही येत असल्याची दबकी चर्चा आहे.
0 अनैतिक धंदे बंद होण्यासाठी पोलीस खाते आणि सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.