नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकाने गुरुवारी सुनंदांचा मुलगा शिव मेनन याची चौकशी केली़दुपारी १़२० च्या सुमारास शिव मेनन एसआयटी कार्यालयात पोहोचला़ एसआयटीने सुमारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ त्याची चौकशी केली़ भारताबाहेर असल्याने शिव मेननची चौकशी होऊ शकली नव्हती़ बुधवारीच तो दिल्लीला पोहोचला़ शिव हा सुनंदा यांच्या दुसऱ्या पतीपासून झालेला मुलगा आहे़ माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासोबतचे सुनंदांचे तिसरे लग्न होते़ सुनंदा यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने आतापर्यंत १५ लोकांची चौकशी केली आहे़ सुनंदा यांचे पती शशी थरूर, त्यांचे काही कर्मचारी आणि निकटच्या मित्रांचा यात समावेश आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)५२ वर्षीय सुनंदा गतवर्षी १७ जानेवारीला दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलात मृतावस्थेत आढळल्या होत्या़ अलीकडे दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुनंदाच्या मुलाची चौकशी
By admin | Updated: February 6, 2015 02:23 IST