शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

सुनंदा पुष्करचा मृत्यू विषप्रयोगाने नव्हे -एफबीआय

By admin | Updated: November 12, 2015 03:26 IST

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषाने किंवा कोणत्याही किरणोत्सारामुळे झाला नसल्याचा दावा अमेरिकेच्या फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशन (एफबीआय) या संस्थेने केला आहे

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषाने किंवा कोणत्याही किरणोत्सारामुळे झाला नसल्याचा दावा अमेरिकेच्या फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशन (एफबीआय) या संस्थेने केला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) सुनंदा पुष्कर यांचा व्हिसेरा तपासण्यासाठी एफबीआयकडे दिला होता. सुनंदा पुष्कर काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी होत. १७ जानेवारी २१०४ रोजी सुनंदा यांचा मृतदेह दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात आढळला होता.नऊ महिन्यांनंतर एफबीआयने तपासणी अहवाल दिल्ली पोलिसांना सुपुर्द केला असून, या अहवालात त्यांच्या व्हिसेऱ्यातील नमुने सुरक्षा मापदंडाच्या आत होते तसेच अ‍ॅलर्जीमुळे विष पसरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा सिद्धांतही एफबीआयने फेटाळून लावला आहे. व्हिसेराचे नमुने फेब्रुवारीत एफबीआयच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. हा अहवाल जाहीर करताना दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी सांगितले की, सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात पुढची कारवाई करण्याआधी वॉशिंग्टनस्थित प्रयोगशाळेचा अहवाल एका वैद्यकीय मंडळाला शहानिशा करण्यासाठी दिला जाईल. डॉक्टरांनी या अहवालाचे परीक्षण केल्यानंतरच त्यांच्या मृत्यूच्या कारणांबाबतचे संकेत मिळतील, असे बस्सी यांनी पत्रकारांना सांगितले.व्हिसेऱ्यातील नमुन्यातील किरणोत्साराबाबत विचारले असता बस्सी यांनी सांगितले की, ते सुरक्षा मापदंडाच्या आत होते. या अहवालाचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालाला जोडला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)-------चौकट-एम्सचे तज्ज्ञ म्हणतात, विषप्रयोगच !शरीरात विष पसरल्यानेच सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला, असे एम्सच्या वैद्यकीय मंडळाचे म्हणणे होते. तथापि, या विषारी पदार्थाचे नाव मात्र वैद्यकीय मंडळाने सांगितले नव्हते. एम्सचे फॉरेन्सिक प्रमुख सुधीर गुप्ता मात्र विषामुळेच सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाल्याच्या मतावर कायम आहेत.---१७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्याच्या एक दिवस आधी त्यांचा टिष्ट्वटरवर पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी वाद झाला होता.