शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून मेहेर तरार यांची 3 तास चौकशी

By admin | Updated: July 18, 2016 10:09 IST

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांची दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने चौकशी केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 18 - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांची चौकशी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही चौकशी केली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही चौकशी करण्यात आली.  शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ रोजी मृतदेह सापडला होता.  
 
सुनंदा यांनी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार व थरुर यांच्या संबंधाबाबत ट्विट केल्यानंतर त्याच्या दुस-याच दिवशी त्यांचा मृतदेह आढळला होता. चौकशीसाठी मेहेर तरार भारतात आल्या होत्या. मध्य दिल्लीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी डिसेंबर महिन्यात चौकशीत सहकार्य करण्यासंबंधी पत्र पाठवलं होतं, ज्याला मेहेर तरार यांनी सकारात्मक उत्तर दिलं होतं. 
 
(सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाचा पुन्हा करणार तपास)
 
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनेकांकडून  मेहेर तरार यांचं नाव समोर आलं होतं. यामध्ये सुनंदा पुष्कर यांची जवळची मैत्रीण आणि पत्रकार नलिनी सिंग यांचाही समावेश होता. सुनंदा पुष्करने शशी थरुर आणि मेहेर यांच्यामध्ये झालेलं बीबीएम संभाषण मिळण्यासाठी माझी मदत मागितली होती. शशी थरुर लोकसभा 2014 निवडणुकीनंतर मेहेर तरारशी लग्न करणार होते असंही सुनंदा पुष्करने सांगितल्याची माहिती नलिनी सिंग यांनी पोलिसांना दिली होती. 
 
(सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषबाधेमुळेच)
 
मेहेर तरार यांनी शशी थरुर यांच्याशी कोणतेही जवळचे संबंध नसल्याचं सांगितलं आहे. सुनंदा पुष्करसोबत जानेवारी / फेब्रुवारी 2014 मध्ये झालेल्या भांडणाबद्दलही मेहेर तरार यांच्याकडे चौकशी करण्यात आली. महिला पोलीस अधिका-यांच्या उपस्थितीत तब्बल 3 तास मेहेर तरार यांची चौकशी कऱण्यात आली. मेहेर तरार यांनी सहकार्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.