शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू घातक रसायनांमुळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 01:17 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर (५३) यांचा मृत्यू घातक रसायनांमुळे झाला असल्याची शक्यता अमेरिकेच्या एफबीआय या तपास संस्थेने वर्तवली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर (५३) यांचा मृत्यू घातक रसायनांमुळे झाला असल्याची शक्यता अमेरिकेच्या एफबीआय या तपास संस्थेने वर्तवली आहे. दिल्लीच्या आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) विषबाधा हे मृत्यूचे कारण नमूद केले होते, त्यालाही या अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे, तथापि विषारी घटक नेमके कोणते याबाबत स्पष्टता नाही.एफबीआयच्या अहवालाबाबत एम्सने केलेल्या विश्लेषणाचा निष्कर्ष दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी शुक्रवारी पत्रकारांसमक्ष उघड केला. सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, हे स्पष्ट करतानाच त्यांनी त्यांच्या व्हिसेरामध्ये किरणोत्सारी पदार्थाचे अस्तित्व आढळून आले नसल्याचे नमूद केले. एम्सने विषबाधेचा अहवाल दिला होता. एफबीआयनेही त्याला दुजोरा दिला असल्याचे एम्सच्या न्यायवैज्ञक विभागाचे प्रमुख सुधीर गुप्ता यांनी सांगितले.मृत्यू नैसर्गिक नव्हता, हे आतापर्यंतच्या तपासातून गोळा केलेल्या पुराव्यांतून स्पष्ट झाले आहे, हे मी खात्रीलायकरीत्या सांगू शकतो, असे बस्सी यांनी म्हटले. एफबीआयने किरणोत्सारी पदार्थांचे अस्तित्व पूर्णपणे नाकारले नाही, मात्र व्हिसेराच्या नमुन्यांची खालावलेली स्थिती पाहता अशा पदार्थांची तीव्रता मोजता आलेली नाही, अशी पुस्ती गुप्ता यांनी जोडली. अतिकिरणोत्सारी पोलोनियम -२१० किंवा पीओ-२१० हे पदार्थ अतिशय दुर्मीळ असून त्यांना हुडकून काढणेही अशक्य असल्याचे एफबीआयच्या अहवालाचा हवाला देत त्यांनी सांगितले. सुनंदा यांचा व्हिसेरा अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी येथील एफबीआयच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला होता. त्यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे या संस्थेने स्पष्ट केले; मात्र तो विषारी घटक नेमका कोणता होता, हे नमूद केले नाही.शशी थरुर यांना पाचारण करणार सुनंदा यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे पाहता दिल्ली पोलिसांनी खासदार शशी थरुर यांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पोलीस अधिकारी वैज्ञानिक पद्धतीने या प्रकरणाचा तपास करीत असून आवश्यकता भासेल तेव्हा त्यांना चौकशीसाठी समन्स पाठविले जातील, असे बस्सी यांनीस्पष्ट केले.