शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

सुनंदा मृत्यूप्रकरणी आता अत्याधुनिक चाचण्या?

By admin | Updated: October 11, 2014 00:26 IST

पोलिसांनी पुरावे गोळा करण्यात ढिलाई दाखविल्याचा आरोप फेटाळतानाच दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी तपास सीबीआयकडे सोपविण्याची शक्यता फेटाळून लावली

नवी दिल्ली : खा. शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूबाबत एम्सच्या डॉक्टरांनी नवा अहवाल पोलिसांना सादर केला असून तो कोणत्याही निष्कर्षाप्रत जाण्याबाबत अपूर्ण असल्यामुळे पोलीस आता नव्या अत्याधुनिक न्यायवैद्यक चाचण्यांचा अवलंब करू शकतात.पोलिसांनी पुरावे गोळा करण्यात ढिलाई दाखविल्याचा आरोप फेटाळतानाच दिल्लीचे पोलीस आयुक्त बी.एस. बस्सी यांनी तपास सीबीआयकडे सोपविण्याची शक्यता फेटाळून लावली. या प्रकरणाचा तपास करण्यास पोलीस सक्षम आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायवैद्यक अहवाल अपूर्ण असून आमच्या तपासाची स्थिती प्रलंबित आहे. अद्यापही आम्हाला पूर्ण न्यायवैद्यक अहवाल मिळाला नसल्याने आम्ही कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचलेलो नाही. आम्ही निष्कर्ष काढल्यानंतरच तुम्हाला माहिती देऊ, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.एम्सच्या डॉक्टरांच्या पॅनेलने वैद्यकीय मंडळाचे १२ पानी मत ३० सप्टेंबर रोजी पोलिसांना सादर केले असून सुनंदा यांचा मेंदू, किडनी, फुफ्फुसे आणि यकृत सामान्यपणे काम करीत होते. त्यांचा मृत्यू विषामुळेच झाला असे वैद्यकीय मंडळाने नमूद केले. पहिल्या अहवालातही हाच निष्कर्ष होता. केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेने (सीएफएसएल) सुनंदाच्या व्हिसेराचा अभ्यास केला असून त्या आधारावर तीन डॉक्टरांच्या पॅनेलने नवा अहवाल दिला आहे. १७ जानेवारी रोजी दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळून आला. पती शशी थरूर आणि पाकिस्तानी महिला पत्रकार मेहर तरार यांच्या कथित प्रेमप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी टिष्ट्वटर युद्ध छेडले होते. त्यामुळे मृत्यू संशयास्पद मानला जात होता.सर्वंकष चौकशी व्हावी- माकपसुनंदा यांच्या मृत्यूमागील कारणांबाबतची अनिश्चितता कायम असून काय घडले ते बाहेर यायला हवे, असे माकपचे राज्य सचिव पिनारायी विजयन यांनी म्हटले. या प्रकरणी सखोल तपासाची गरज असून सुनंदा यांच्या मृत्यूचे सत्य जाणून घेण्याचा देशातील जनतेला अधिकार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री खा.शशी थरुर यांनी पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल एम्सच्या डॉक्टरांनी नवा अहवाल दिल्याबद्दल भाष्य टाळले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)