शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

'सूट बूट की सरकार' - 'अरहर मोदी' या आहेत राहुल गांधींच्या घोषणा

By admin | Updated: July 28, 2016 19:18 IST

संसदेत उपस्थितांचं लक्ष स्वतःकडे वेधण्यासाठी ते जाणूनबुजून मोदींविरोधात टीकात्मक घोषणा करत असल्याची चर्चा आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 28 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या संसदेत प्रसिद्धीपासून काहीसे दूर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे संसदेत उपस्थितांचं लक्ष स्वतःकडे वेधण्यासाठी ते जाणूनबुजून मोदींविरोधात टीकात्मक घोषणा करत असल्याची चर्चा आहे. 'फेअर अँड लव्हली' आणि 'सूट बूट की सरकार'नंतर आता त्यांनी मोदी सरकारविरोधात नवी घोषणा शोधून काढली आहे. 

डाळ आणि वाढत्या महागाईवर मोदी सरकारला लक्ष्य करण्यासाठी त्यांनी 'अरहर मोदी' अशी घोषणा दिली आहे. हर हर मोदींऐवजी त्यांनी चक्क 'अरहर मोदी' अशी घोषणा दिल्यानं उपस्थितांमध्ये ते चर्चेचा विषय ठरले आहेत. गेल्या 4 महिन्यांपूर्वीपासून वाढलेल्या तूरडाळीच्या किमती आणि महागाईच्या मुद्द्यावरून त्यांनी या घोषणा दिल्या आहेत.

गावागावातील लोक आता हर हर मोदीऐवजी 'अरहर मोदी अरहर मोदी' नव्या घोषणेचा जप करत असल्याची टीका राहुल गांधींनी लोकसभेत केली आहे. मोदी सरकारच्या काळात डाळींची किंमतही 120 टक्क्यांनी वाढल्याचं यावेळी राहुल गांधींनी सांगितलं आहे.