शेळगाव येथे शेतकर्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
तळेगाव, ता. जामनेर : तळेगाव / शेळगाव येथील शेतकर्याने दुष्काळी हंगामामुळे कोरडवाहू शेतीमध्ये उत्पादनात कमालीची घट झाल्यामुळे कर्जाला कंटाळून अखेर आत्महत्या केली.
शेळगाव येथे शेतकर्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
तळेगाव, ता. जामनेर : तळेगाव / शेळगाव येथील शेतकर्याने दुष्काळी हंगामामुळे कोरडवाहू शेतीमध्ये उत्पादनात कमालीची घट झाल्यामुळे कर्जाला कंटाळून अखेर आत्महत्या केली. या बाबत वृत्त असे की, शेळगाव येथील रमेश केशव नरवाडे (वय ५०) हे गेले दोन / तीन महिन्यांपासून कर्जाचा विचार करून अति प्रमाणात दारू सेवन करीत. तीन मुलींच्या लग्नाचे कर्ज व मुलगी व मुलाचे लग्न बाकी असल्याने पुढे आपले कसे होणार या विचाराने घरात नेहमी चिडचिड करीत. अखेर दि.१३ रोजी घरातून बाहेर पडून शहापूर शिवारातील मधुकर गोबा सपकाळ यांच्या शेतात मृतावस्थेत आढळून आल्याने जामनेर पोलीस स्टेशनला याबाबत शेळगाव पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून घटनास्थळी पंचनामा करून १७ ए. डी. नावाने गुन्ांची नोंद करण्यात आली.दुष्काळी हंगाम व गारपीटमुळे अतोनात नुकसान होऊन शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरी शासन दरबारी शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यास सरकार असमर्थ ठरत आहे. तरी कर्जबाजारी शेतकर्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा व शेतकर्याच्या आत्महत्या थांबवाव्या, असे जनमतात बोलले जात आहे. रमेश नरवाडे यांच्या पश्चात एक मुलगा, पत्नी, चार मुली व आई, वडील असा परिवार आहे. याबाबत घटनास्थळी पोलीस निरीक्षक शेख साहेब, पी.आय. वैशाली पवार, संजय तायडे व राठोड यांनी पंचनामा केला.