शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून पित्याने भररस्त्यात मुलाची हत्या करून केली आत्महत्या

By admin | Updated: June 7, 2016 11:10 IST

कौटुंबिक वादातून एका पित्याने स्वत:च्या ३ वर्षांच्या मुलाला भररस्त्यात गोळ्या घालून संपवले व त्यानंतर स्वत:ही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली.

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. ७ - कौटुंबिक वादातून एका पित्याने स्वत:च्या ३ वर्षांच्या मुलाला भररस्त्यात गोळ्या घालून संपवले व त्यानंतर स्वत:ही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या हुनमानगडमध्ये सोमवारी घडली. रायसिंग गोडोरा असे त्या मृत इसमाचे नाव असून गुलशन असे त्याच्या तीन वर्षांच्या मुलाचे नाव होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शेतकरी असलेल्या रायसिंगचे व त्याच्या पत्नीचे पटत नसल्याने दोन वर्षांपूर्वीच ते दोघे वेगळे राहू लागले व त्यांनी घटस्फोटासाठीही अर्ज केला होता. मात्र गुलशन हा त्यांचा मुलगा, वडिलांसोबतच रहात असे. 
पत्नीशी काहीतरी महत्वाचे बोलायचे असल्याने सोमवारी रायसिंग आपल्या मुलाला घेऊन पत्नीला भेटण्यास गेला. मात्र त्यावेळी ती कामावर जात असल्याने तिने थांबून रायसिंगशी बोलण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या रायसिंगने पिस्तुल काढून त्याची पत्नी व तिच्या कुटुंबियांवर गोळ्या झाडल्या, मात्र ते तिथून कसेबसे निसटले. त्यानंतर संतापाच्या भरात रायसिंगने प्रथम मुलगा गुलशनवर गोळ्या झाडल्या आणि स्वत:चेही जीवन संपवले. 
या घटनेत अवघ्या तीन वर्षांचा गुलशन जागीच ठार झाला तर रायसिंगने रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला.