शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

अशी झाली म्यानमारमधील कारवाई

By admin | Updated: June 11, 2015 08:59 IST

भारतीय लष्कर आणि वायूदलाने एकत्र येत सीमा ओलांडून म्यानमारमध्ये बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराच्या इतिहासात ही केवळ अभूतपूर्व घटना

नवी दिल्ली : भारतीय लष्कर आणि वायूदलाने एकत्र येत सीमा ओलांडून म्यानमारमध्ये बंडखोरांचे तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराच्या इतिहासात ही केवळ अभूतपूर्व घटना नसून भारत आक्रमक प्रत्युत्तर देऊ शकतो, असा संदेशच भारताने दिला आहे. विशेषत: भारतातील सशस्त्र बंडखोरांना चीन मदत करत असल्याच्या गुप्त वार्तेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरते. चीन भारताच्या सर्व बाजूंनी गुंतवणूक करत म्यानमार, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान अशी मालिका तयार करत आहे, त्याचप्रमाणे सागरी व्यापारी मार्गाच्या नावाखाली भारताची कोंडी करण्याचीही त्याची योजना आहे. भारताच्या ताज्या साहसी आॅपरेशनमुळे चीनला आपल्या कारवायांचा वेग नक्कीच कमी करावा लागेल, अशी लक्षणे आहेत.गेली अनेक वर्षे ईशान्येकडील बंडखोर आणि अस्थिरतेच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या सात राज्यांमध्ये पायाभूत सुविधा वाढाव्यात, तेथील विद्यार्थ्यांना देशभरात शिक्षणासाठी जायला मिळावे तसेच मुख्य प्रवाहात आपण आहोत याची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न सुरूच असतात. तरीही फुटीरवाद्यांच्या हल्ल्यांमुळे व स्थानिक प्रश्नांमुळे त्यावर योग्य तोडगा निघू शकलेला नाही. ४ जून रोजी मणिपूरच्या चंडेल जिल्ह्यामध्ये हल्ला करून अतिरेक्यांनी १८ जवानांचे प्राण घेतल्यामुळे भारतीय सुरक्षा व्यवस्थेला जबरदस्त धक्का बसला. भारतीय लष्कर लवकरच त्याला प्रत्युत्तर देईल आणि त्याची तयारी सुरू आहे अशा बातम्याही त्यानंतर येऊ लागल्या होत्या. दरम्यान, या संघटना ४ जूनच्या हल्ल्याप्रमाणे पुन्हा हल्ले करण्याच्या विचारात होत्या. मात्र त्यापूर्वीच त्यांचे कंबरडे मोडण्यात आले. या सर्व घडामोडी गुप्तरीत्या, जलदगतीने करण्यात आल्या, त्यामुळेच कारवाईनंतर भारतीयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. (लोकमत न्यूज नेटवर्क)