शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआरएनएसएस-१ डी’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Updated: March 29, 2015 01:25 IST

‘आयआरएनएसएस-१ डी’ या भारताच्या चौथ्या नौकानयन उपग्रहाचे शनिवारी ‘पीएसएलव्ही सी-२७’ या धृवीय प्रक्षेपण यानाद्वारे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

श्रीहरीकोटा : ‘आयआरएनएसएस-१ डी’ या भारताच्या चौथ्या नौकानयन उपग्रहाचे शनिवारी ‘पीएसएलव्ही सी-२७’ या धृवीय प्रक्षेपण यानाद्वारे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणाच्या काही मिनिटातच हा उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. या उपग्रहाच्या प्रक्षेपणामुळे भारत आता स्वत:ची नौकानयन प्रणाली (इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम) सुरू करण्यास सज्ज झाला आहे.५९.५ तास चाललेल्या उलटगणतीनंतर भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) आपल्या सर्वांत विश्वासार्ह अशा ‘पीएसएलव्ही सी-२७’ या प्रक्षेपण यानाद्वारे १४२५ किलो वजनाचा चौथा नौकानयन उपग्रह शनिवारी पहाटे ५.१९ वाजता सतीश धवन अंतराळ केंद्राच्या द्वितीय लाँच पॅडवरून यशस्वीरीत्या प्रक्षेपित केला आणि प्रक्षेपणाच्या २१ मिनिटाने हा उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापितही करण्यात आला. ‘मिशन यशस्वी ठरले आहे आणि उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापित झाला आहे,’ अशी प्रतिक्रया इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी व्यक्त केली. किरण कुमार यांनी इस्रोचे अध्यक्षपद सांभाळल्यानंतरचे हे त्यांचे पहिलेच मिशन होते. ‘आयआरएनएसएस-१ डी’ उपग्रह यशस्वीरीत्या अंतराळात नेणाऱ्या पीएसएलव्हीचीही ही २८ वी अंतराळ वारी होती. (वृत्तसंस्था)