पेठवडगाव : खुल्या शालेय वाद्यवृंद वादन स्पर्धेत येथील डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलने द्वितीय क्रमांक पटकाविला.कोल्हापूर येथे विबग्योर स्कूलमध्ये ड्रम्स ॲण्ड रोजेज् बँड स्पर्धा झाली. यामध्ये पुनावाला स्कूलचे विद्यार्थी निरज वसवाडे (की बोर्ड), सिद्धांत पोळ (ड्रम सेट), ओंकार माने (त्रिबल सेट), हर्षवर्धन कदम (खंजिरी), स्वस्तिक मडके (बेस ड्रम), प्रणीत कांबळे (स्नेहर झांझरी) हे सहभागी झाले. त्यांनी मिशन इम्पॉसिबल थिम व गीव्ह मी फ्रीडम यावर संगीत वादन केले. सोहम चिकोर्डे याने कार्टुन क्रिएशनमध्ये, तर मिसबा मोमीन हिने आर्ट ॲण्ड क्राफ्ट स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांना अध्यक्षा विद्या पोळ, सरदार जाधव, प्रवीण देसाई यांचे प्रोत्साहन, तर सतीश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)फोटो - मेलवरपेठवडगाव येथील डॉ. सायरस पुनावाला स्कूलचे संगीत स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे विजेते विद्यार्थी. यावेळी प्राचार्य सरदार जाधव, सतीश पाटील, आदी.
वाद्यवृंद वादन स्पर्धेत पुनावाला स्कूलचे यश
By admin | Updated: December 16, 2014 23:48 IST