शिवसेना शहर उपप्रमुखास अंतरिम जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2015 23:27 IST
सोलापूर :
शिवसेना शहर उपप्रमुखास अंतरिम जामीन
सोलापूर :पूर्ववैमनस्यातून दोन गटात हाणामारी आणि पोलिसांवर दगडफेक करून चिथावणी दिल्या प्रकरणात मुख्य सूत्रधार शिवसेना शहर उपप्रमुख रामसिंग कल्याणसिंग धनीवाले (वय 52, रा़ लोधी गल्ली, सोलापूर) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ डी़ अग्रवाल यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला़ काँग्रेस नगरसेविकेचे पती किरण म्हेत्रे आणि शिवसेना शहर उपप्रमुख धनीवाले यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य आह़े 30 ऑगस्ट रोजी पतंग उडवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये भांडणे झाली़ जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी गेला असता संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक झाली़ पोलिसांना गंभीरपणे जखमी करुन चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली धनीवाले यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला़ अटक होण्याच्या भीतीने धनीवाले यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला़ न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करीत 11 सप्टेंबर रोजी सरकार पक्षास म्हणणे सादर करण्याचे आदेश दिल़े या प्रकरणात आरोपीच्या वतीने अँड़ सुरेश पाटील-कुरुलकर, अँड़ दत्ता पवार, अँड़ राजेंद्र पाटेकर यांनी काम पाहिल़े (प्रतिनिधी)