शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचे मौन सुटेपर्यंत संघर्ष -काँग्रेस

By admin | Updated: July 2, 2015 02:09 IST

आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्याकडून एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट होत असतानाच काँग्रेसने मोदी सरकारवरील हल्ला अधिक तीव्र केला आहे.

शीलेश शर्मा, नवी दिल्लीआयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्याकडून एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट होत असतानाच काँग्रेसने मोदी सरकारवरील हल्ला अधिक तीव्र केला आहे. पक्ष नेतृत्वाने आपल्या काही वरिष्ठ नेत्यांना राज्य शाखेच्या सहकार्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे या भाजप नेत्यांविरुद्ध झालेल्या आरोपांबाबत अधिकाधिक कागदोपत्री पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे या कलंकित मंत्र्यांना डच्चू देण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहू नये अशी परिस्थिती निर्माण करण्याचे डावपेच काँग्रेसने आखले असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. या मुद्यावर विरोधी पक्ष एकजूट असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच भाजपा अपप्रचाराद्वारे विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असली तरी ते शक्य नाही असेही पक्षाने स्पष्ट आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनीही याची पुष्टी केली. ललितगेट प्रकरणासोबतच भाजपाशासित राज्यांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा हाती लागल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारविरुद्ध दंड थोपटले आहेत. काँग्रेसचे माध्यम प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधानांचा उल्लेख मौनी मोदी असा करून त्यांच्या मौनामागील कारण काय? असा सवाल उपस्थित केला. त्यांनी काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारमध्ये मंत्री राहिलेले पी. चिदंबरम आणि ब्रिटिश चान्सलर यांच्यादरम्यान ललित मोदींबाबत झालेली चर्चा सार्वजनिक करण्याची मागणीही केली. सुरजेवाला यांनी सरकारला सहा प्रश्नांची उत्तरेही मागितली. सायंकाळी काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनीही हा मुद्दा उपस्थित करून सरकारवर आगपाखड केली.