शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र-केजरी सरकारचा संघर्ष सुरूच

By admin | Updated: June 11, 2015 23:44 IST

मुख्य सचिव (गृह आणि भूमी व भवन) धरमपाल यांना त्यांच्या मूळ कॅडरमध्ये परत पाठविण्याचा निर्देश देणारा दिल्ली सरकारचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने

नवी दिल्ली : मुख्य सचिव (गृह आणि भूमी व भवन) धरमपाल यांना त्यांच्या मूळ कॅडरमध्ये परत पाठविण्याचा निर्देश देणारा दिल्ली सरकारचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी रद्द केला. एजीएमयूटी कॅडरच्या अधिकाऱ्याची बदली करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे, असे नमूद करून केंद्र सरकारने दिल्ली सरकारचा हा निर्णय अवैध ठरविला.१९९२ च्या तुकडीतील एजीएमयूटी कॅडरचे आयएएस अधिकारी अश्विनी कुमार यांची दिल्ली सरकारचे नवे सचिव (भूमी आणि भवन) म्हणून झालेली नियुक्तीही गृहमंत्रालयाने रद्द केली. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर दिल्लीच्या मुख्य सचिवांनी गुरुवारी धरमपाल यांना प्रधान सचिव (गृह आणि भूमी व भवन) पदाचा कार्यभार परत केला.गृहमंत्रालयाने १० जून रोजी दिल्ली सरकारच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे की, ‘डीओपीटीने अखिल भारतीय सेवा (संयुक्त कॅडर) नियम १९७२ अंतर्गत एजीएमयूटी कॅडरच्या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी केंद्रीय गृह सचिवांच्या नेतृत्वात एका संयुक्त कॅडरचे (जेसीए) गठन केलेले आहे. त्यामुळे एजीएमयूटी कॅडरच्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचा जेसीएला अधिकार आहे. त्यामुळे धरमपाल यांना परत पाठवून अन्य अधिकाऱ्याचा प्रभार सोपविणे अवैध आहे.’ (लोकमत न्यूज नेटवर्क)