शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या वेशात पत्नीला भेटायला गेलेल्या पतीची जोरदार धुलाई

By admin | Updated: July 12, 2016 17:48 IST

पत्नीला भेटण्यासाठी चक्क महिलेचा वेश घेऊन गेलेल्या पतीला लोकांनी चोर समजून जोरदार चोप दिला. शेखर असं या व्यक्तीचं नाव असून जयम कोंडम परिसरात ते राहतात.

ऑनलाइन लोकमत - 
विल्लूपुरम (तामिळनाडू), दि. 12 - आपल्या पत्नीला भेटण्यासाठी एका व्यक्तीने जोरदार शक्कल लढवली , पण त्याचा खेळ त्याच्यावरच उटलला. पत्नीला भेटण्यासाठी चक्क महिलेचा वेश घेऊन गेलेल्या पतीला लोकांनी चोर समजून जोरदार चोप दिला. शेखर असं या व्यक्तीचं नाव असून जयम कोंडम परिसरात ते राहतात. सिंगापूरमधील आपली नोकरी सोडून ते परत भारतात आले होते. पण त्यामुळे त्यांची सासू नाराज झाली आणि आपली मुलगी इंदिराला आपल्यासोबत घेऊन गेली. 
 
इंदिरा गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या आईसोबत राहत आहे. शेखर यांना आपली पत्नी इंदिराला भेटण्याची तीव्र इच्छा झाली होती. ओळख लपवण्यासाठी शेखर यांनी मुलींचा पंजाबी ड्रेस घातला आणि ओढणीने चेहरा झाकून घेतला. अशाप्रकारे वेश बदलून शेखर आपल्या पत्नीला भेटण्यासाठी गेले. सासरी घरापासून थोड्या अंतरावर त्यांची पत्नीशी भेटदेखील झाली. 
 
शेखर आणि इंदिरा एकत्र फिरत असताना काही स्थानिकांना शंका आली. कारण शेखरने महिलेचा वेश केला असला तरी चप्पल मात्र पुरुषांचीच घातली होती. लोकांना लहान मुलांचं अपहरण करणारी व्यक्ती असल्याचा संशय आला. आणि मग लोकांनी हल्ला चढवत शेखरची जोरदार धुलाई केली. शेखरने लोकांना शेवटी सगळं खरं सांगितलं तेव्हा लोकांची खात्री पटली. 
 
या परिसरात एका लहान मुलाचं अपहरण झालं होतं. त्यामुळे कोणी संशयित व्यक्ती दिसली की स्थानिकांना शंका येते. स्थानिकांनी शेखरला पोलिसांच्या हवाली केलं होतं. पोलिसांनी समज देऊन शेखरला सोडून दिलं.