मारहाण करून महिलांना लुटणारा गजाआड
By admin | Updated: May 18, 2015 01:16 IST
भद्रावती : रस्त्याने जाणार्या महिलांंना लिफ्ट दिल्यानंतर मारहाण करून त्यांना लुटणार्या एका कुख्यात गुंडाला भद्रावती पोलिसांनी जेरबंद केली आहे. विशाल लेणारे (३६) असे या गुंडाचे नाव असून त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, गोंडपिपरी, गडचांदूर, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, जाम व भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
मारहाण करून महिलांना लुटणारा गजाआड
भद्रावती : रस्त्याने जाणार्या महिलांंना लिफ्ट दिल्यानंतर मारहाण करून त्यांना लुटणार्या एका कुख्यात गुंडाला भद्रावती पोलिसांनी जेरबंद केली आहे. विशाल लेणारे (३६) असे या गुंडाचे नाव असून त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, गोंडपिपरी, गडचांदूर, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, जाम व भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.भद्रावती येथील एक महिला चंद्रपूरला जाण्यासाठी २७ एप्रिलला तहसील कार्यालयाशेजारी उड्डाण पुलाजवळ बसची वाट पाहत असताना, विशाल इंडिका गाडीने तेथे आला. त्याने तिला चंद्रपूरला सोडतो असे सांगून गाडीत बसवले. मात्र विशालने साखरवाही फाट्याजवळ कार वळविली व टोल नाक्याजवळ असलेल्या निर्जनस्थळी नेऊन त्या महिलेला बेदम मारहाण केली. तिचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने व अडीच हजार रुपये असा एकूण ६७ हजार ५०० रुपयांचा माल हिसकावून तो पसार झाला.पीडित महिलेने भद्रावती पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. स्केचच्या आधाराने पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आणि यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर (ता. पांढरकवडा) येथे त्याला अटक केली. चौकशीदरम्यान, अशाचप्रकारचे सहा गुन्हे केल्याची कबुली त्याने पोलिसांपुढे दिली. (शहर प्रतिनिधी)