पोलिसाच्या हत्येतील आरोपीच्या अटकेसाठी रास्ता रोको
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
तिसगाव : पोलीस नाईक दीपक कोलते यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यास होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ तिसगाव-पैठण महामार्गावरील चितळी फाटा येथे मंगळवारी ग्रामस्थ व विविध संघटनांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पोलिसाच्या हत्येतील आरोपीच्या अटकेसाठी रास्ता रोको
तिसगाव : पोलीस नाईक दीपक कोलते यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यास होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ तिसगाव-पैठण महामार्गावरील चितळी फाटा येथे मंगळवारी ग्रामस्थ व विविध संघटनांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे, संदीप ताठे, उपसरपंच कचरु आमटे, भाजपाचे नवनाथ वाघ यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांच्या भावनेशी समरस होत पोलीस उपनिरीक्षक के.बी. जोपळे यांनी निवेदन स्वीकारले. तपासात प्रगती होत नसल्याच्या निषेधार्थ यापुढे परिसरातील प्रत्येक गावांच्यावतीने रस्त्यावर उतरुन निषेध करण्याचे संकेत देत आंदोलक तासाभराने राज्यमार्गावरुन उठले.आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाल्याने महाशिवरात्रीनिमित्त वृध्देश्वरकडे दर्शनासाठी जाणारे भाविक व दूध संकलन करुन वाहतूक करणारांची गैरसोय झाली. पोलिसांनाही आपल्याविषयीच्या सार्वत्रिक जनभावना ऐकून वास्तवतेचा उमाळा आला. यावेळच्या चर्चेत शंकरराव कोलते, कृष्णा बारगुजे, बलभीम ढमाळ, प्रवीण कोठुळे, अमोल कदम व इतरांनी भाग घेतला. भाजपा, नरेंद्र मोदी आर्मी,महाराष्ट्र भटक्या विमुक्त संघटना यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता.