शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नवउद्योजकांसाठी ‘स्टार्टअप इंडिया’ मोहीम

By admin | Updated: January 17, 2016 03:39 IST

देशात नवउद्योजकांची पिढी घडविण्यासाठी उद्यमशीलतेला प्रोत्साहन आणि नवविचारांना बळ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला.

नवी दिल्ली : देशात नवउद्योजकांची पिढी घडविण्यासाठी उद्यमशीलतेला प्रोत्साहन आणि नवविचारांना बळ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींसह देशातील सुमारे १५०० स्टार्टअप प्रमुखांच्या उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात करताना केंद्र सरकार या देशातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या ७० वर्षांत जे घडू शकले नाही ते सर्व आम्ही आता स्टार्टअपच्या बळावर करू शकतो, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. स्टार्टअपसाठी अनेक योजना आणि सवलती यावेळी त्यांनी जाहीर केल्या. ते म्हणाले,आमचे विचार वेगळे आहेत. सरकारने हे केले पाहिजे, ते केले पाहिजे अशी बहुतांश लोकांची भावना असते. परंतु सरकारने काय करू नये असा वेगळा विचार मी करीत असतो. आम्ही काय करू नये ते आपणच सांगा, असे आवाहन मोदी यांनी कार्यक्रमाला उपस्थित नवउद्योजकांना केले.यावेळी मोदी यांनी स्टार्टअप कार्ययोजना सुद्धा जारी केली. धाडसी आणि जोखीम पत्करण्याची तयारी असलेले लोकच यात यशस्वी होऊ शकतात. बँक बॅलन्स बघणारे पुढे जाऊ शकत नाहीत,याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उद्घाटनापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवनात आयोजित स्टार्टअपवरील प्रदर्शनही बघितले. याप्रसंगी अर्थमंत्री अरुण जेटली, वाणिज्य व उद्योग मंत्री निर्मला सीतारमन, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा आदी उपस्थित होते. काही महत्वाच्या घोषणा...-स्टार्टअपना आर्थिक मदतीकरिता १०,००० कोटी रुपयांचा निधी.-स्टार्टअपना पहिली तीन वर्षे आयकर सवलत.- व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकीला कॅपिटल गेन्स टॅक्स नाही. -एकच दिवसात स्टार्टअप सुरू करण्यासाठी पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमाने वाटप प्रक्रिया-स्वप्रमाणनची सुविधा, भारताला स्टार्टअप हब बनविणार-पेटंट प्रक्रियेचे सुलभीकरण, पेटंट शुल्कात ८० टक्क्यांपर्यत घट-चार वर्षात दोन हजार कोटी रुपयांचा क्रेडिट गॅरंटी निधी-सरकारी खरेदीत स्टार्टअपना सवलत-नवविचारांच्या प्रोत्साहनासाठी ‘अटल अविष्कार योजना’-५ लाख शाळांमध्ये १० लाख विद्यार्थ्यांसाठी नवविचार कार्यक्रम(लोकमत न्यूज नेटवर्क)