शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांच्या डागडुजीवरून अधिकारी धारेवर स्थायी समितीची सभा : पुढील सभा होऊन न देण्याचा इशारा

By admin | Updated: January 8, 2016 23:18 IST

जळगाव : शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या डागडुजीच्या विषयावरून मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांनी स्थायी समितीच्या सभेत अधिकार्‍यांना धारेवर धरले. खड्डे बुजविण्याच्या कामाला त्वरित सुरुवात न झाल्यास पुढील सभा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जळगाव : शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांच्या डागडुजीच्या विषयावरून मनसेचे गटनेते ललित कोल्हे यांनी स्थायी समितीच्या सभेत अधिकार्‍यांना धारेवर धरले. खड्डे बुजविण्याच्या कामाला त्वरित सुरुवात न झाल्यास पुढील सभा होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. कॉलनी एरियातील प्रमुख रस्त्यांची तर वाईट परिस्थिती आहे. मनपा बांधकाम विभागाकडून मात्र काहीही हालचाल नाही. डांबर असले तर खडी नगरसेवकांकडे मागितली जाते. याबाबत कोल्हे यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. डांबर घेतले तर खडीपण घ्या. खडी नगरसेवकांकडे मागण्याची पद्धत बंद करा, असे बजावले. खड्डे बुजविण्याचे काम कधी सुरू करता? अशी विचारणा उपायुक्त व शहर अभियंता यांना केली.
त्यावर शहर अभियंता थोरात यांनी डांबर घेतले आहे. खडी घेऊन काम सुरू करतो, असे सांगितले. त्यावर काम सुरू न झाल्यास यापुढची सभा होऊ देणार नाही, असा इशारा कोल्हे यांनी दिला.
तसेच लाईट विभागाला ट्यूब उपलब्ध करून दिलेल्या असतानाही नगरसेवकांकडून ट्यूबचा बॉक्स उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
उपलब्ध साहित्यातून कुठे काम सुरू आहे? याची माहिती पुढील सभेत देण्याची मागणी केली.
----- इन्फो-----
जलतरण तलाव दुरुस्ती सुरू
भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे यांनी मनपाच्या जलतरण तलावाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभापती नितीन बरडे यांनी तलावाच्या कुंपण भिंतीच्या दुरुस्तीची तसेच इतर किरकोळ दुरुस्ती कामांच्या निविदांना मंजुरी मिळाली असून लवकरच दुरुस्तीचे काम सुरू होईल, असे सांगितले.
----- इन्फो-----
स्लॉटर हाऊस फीमध्ये कपात
शहरातील विविध मटण मार्केट व स्लॉटर हाऊसमधील स्लॉटर फीचे दर जास्त असल्याने ते कमी करण्याची मागणी व्यापार्‍यांनी केली होती. त्यावर बकर्‍याचा दर ३० रुपये वरून १० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपाने विरोध केल्याने बहुमताने विषय मंजूर झाला.