क्रीडा : पोंबुर्फा बॉईज, स्कॅन नास्नोडात आज अंतिम लढत
By admin | Updated: September 11, 2015 21:24 IST
ग्लेन टिकलो फिरता करंडक फुटबॉल स्पर्धा
क्रीडा : पोंबुर्फा बॉईज, स्कॅन नास्नोडात आज अंतिम लढत
ग्लेन टिकलो फिरता करंडक फुटबॉल स्पर्धा म्हापसा : पहिल्या हळदोण मतदारसंघ ग्लेन टिकलो फिरता करंडक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना पोंबुर्फा बॉईज आणि स्कॅन नास्नोडा या संघांमध्ये शनिवार, दि़ 12 रोजी सायंकाळी 4.45 वाजता हळदोणा येथील किटला मैदानावर होणार आहे.या वेळी हळदोणा मतदारसंघातील आजी-माजी खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आह़े या कार्यक्रमास उपसभापती अनंत शेट, अर्जुन पुरस्कार विजेते ब्र?ानंद शंखवाळकर, फा. ऑस्कर गार्डेरो उपस्थित राहणार आहेत. विजेत्या संघाला 3 हजार व चषक, उपविजेत्याला 2 हजार बक्षीस व करंडक देण्यात येतील. अंतिम सामन्यापूर्वी मयडे गल्र्स आणि हळदोण गल्र्स यांच्यात प्रदर्शनीय सामना 4 वा. होणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)