शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

संसदेची सुरक्षा विशेष कमांडो प्रशिक्षित पथकाकडे

By admin | Updated: July 4, 2014 05:41 IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासूनच खास संसदेसाठी उभारलेल्या विशेष कमांडो प्रशिक्षित पथकाने संसद भवन परिसराच्या संरक्षणाची धुरा स्वीकारली आहे

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवस आधीपासूनच खास संसदेसाठी उभारलेल्या विशेष कमांडो प्रशिक्षित पथकाने संसद भवन परिसराच्या संरक्षणाची धुरा स्वीकारली आहे. हे पथक देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाने तयार केले आहे. २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर अशा प्रकारच्या पथकाची उभारणी करण्याचे योजण्यात आले होते. या पथकातील कमांडो व सुरक्षा जवान हे पार्लमेंट ड्युटी ग्रुप (पीडीजी) या नावाने ओळखले जातील.गेल्या काही काळापासून संसद भवनाच्या परिसरात या पथकाला तैनात करण्यात आले असून, त्यांनी येथील संपूर्ण व्यवस्था आपल्या हाती घेतली आहे. या पथकातील कमांडो व जवान २४ तास संसद भवन परिसरात निगराणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय सत्र ७ जुलैपासून सुरू होत आहे. या पथकाकडे संपूर्ण संसद भवनाच्या संरक्षणाची जबाबदारी राहणार असून त्यात मुख्य संसद भवन, स्वागत कार्यालय, संसदीय ज्ञानपीठ व संसद भवनाची जोड इमारत यांचा समावेश राहील. हे पथक दिल्ली पोलीस, संसद सुरक्षा पथक व एनएसजी कमांडोसोबतच्या समन्वयाने संसद भवन परिसरात येणारे अतिविशिष्ट व्यक्ती, खासदार व भेटीस येणाऱ्या अन्य पाहुण्यांची सुरक्षितता व्यवस्था सांभाळणार आहे. या पथकात १५०० जवान असतील. हे जवान केवळ कमांडो प्रशिक्षण वा युद्धनीतीतच प्रवीण नसतील तर आपत्ती व्यवस्थापनातही त्यांचा हातखंडा असेल. हे पथक संसद भवनाच्या अतिरिक्त सचिवांच्या अंतर्गत काम करेल व त्याचा अंतिम अधिकार केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक यांच्याकडे राहील. (लोकमत न्यूज नेटवर्क)