शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातांच्या चौकशीसाठी विशेष समिती:सुरेश प्रभू

By admin | Updated: February 15, 2017 20:34 IST

नेपाळ, दुबईतून संशयित ताब्यात; उर्वरितांना शोधण्याचे प्रयत्नरत्नागिरी : कोकण रेल्वे तसेच देशातील काही अन्य रेल्वे मार्गांवर अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न काही प्रवृत्तींकडून झाले आहेत. या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने नेपाळ व दुबईतून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच अशा प्रकारांबाबत विशेष समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चौकशीचे काम ...

नेपाळ, दुबईतून संशयित ताब्यात; उर्वरितांना शोधण्याचे प्रयत्नरत्नागिरी : कोकण रेल्वे तसेच देशातील काही अन्य रेल्वे मार्गांवर अपघात घडवून आणण्याचे प्रयत्न काही प्रवृत्तींकडून झाले आहेत. या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने नेपाळ व दुबईतून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच अशा प्रकारांबाबत विशेष समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीने चौकशीचे काम सुरू केले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. प्रभू म्हणाले, कोकण रेल्वे मार्गावर मुंबईतील दिवा स्थानकापासून काही अंतरावर गेल्या काही दिवसांत रेल्वे रुळांजवळ स्फोटक जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. तसेच रेल्वे रूळांवर अपघात व्हावा, अशा हेतूनेच रेल्वेचे जुने रूळही मार्गावर आडवे टाकून ठेवण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. असेच प्रकार अन्य ठिकाणीही रेल्वेबाबत घडले आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेबरोबरच अन्य रेल्वे यंत्रणाही सतर्क झाली आहे. तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने यात गंभीरपणे लक्ष घातले आहे. या प्रकारांमागे नेमके कोण आहे, त्याचा छडा लावला जाणार आहे.गेल्या दोन वर्षांच्या काळात कोकण रेल्वेची विकासात्मक घोडदौड अत्यंत वेगाने सुरू असून यातर्फे अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच कोकण रेल्वेच्या प्रकल्पांसाठी २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ही तरतूद समभागांच्या रूपात आहे. चिपळूण-कर्‍हाड मार्गासाठी ३०० कोटी, मार्ग विद्युतीकरणासाठी २०० कोटी, तर रोहा ते वीरपर्यंतच्या मार्ग दुपदरीकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील अर्थसंकल्पात आणखी निधीची तरतूद कोकण रेल्वेसाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)संभाव्य ६४ अपघात टाळण्यात यशगेल्या काही महिन्यांत ६४ ठिकाणी संभाव्य अपघात टाळण्यात यश आले. कोकण रेल्वे मार्गावरही दिवा स्थानकापासून काही अंतरावर घातपाताचे प्रयत्न केले गेले. परंतु रेल्वे कर्मचारी व प्रवासी, नागरिक यांच्या जागरुकतेमुळे हे अपघात टाळण्यात यश आले. रेल्वे प्रवास हा अत्यंत सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. रेल्वेच्या सुरक्षेसाठी एक लाख कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे. नागरिकांनीही रेल्वेला सहकार्य केल्यास अपघात टाळणे शक्य होईल, असे प्रभू यावेळी म्हणाले.