शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक जिल्ह्यात विशेष लवाद

By admin | Updated: January 11, 2017 01:08 IST

रस्ते अपघातग्रस्तांना जलद न्याय देण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक जिल्ह्यात विशेष लवाद स्थापन करण्याच्या तयारीत असून

नितीन अग्रवाल / नवी दिल्लीरस्ते अपघातग्रस्तांना जलद न्याय देण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक जिल्ह्यात विशेष लवाद स्थापन करण्याच्या तयारीत असून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात येणाऱ्या मोटार वाहन (दुरुस्ती) विधेयकात यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे.ठरल्याप्रमाणे सर्व काही व्यवस्थित पार पडल्यास देशभरातील सर्व जिल्ह्यांत रस्ता अपघात लवाद स्थापन केले जातील. हे विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्याही परिस्थितीत संमत केले जाईल, असा विश्वास केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.या मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरात दरवर्षी ५ लाख जण रस्ते अपघातात जखमी होतात. यात दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात, तसेच अनेक जणांच्या नशिबी कायमचे अपंगत्व येते. अपघातग्रस्त आणि त्याच्या कुटुंबियांना भरपाईसाठी न्यायालयात वारंवार चकरा माराव्या लागतात. वाहन अपघात विशेष लवादामुळे अशा प्रकरणात लवकर न्यायनिवाडा होऊन संबंधितांना मोठा दिलासा मिळेल.भरपाई वाढणार या दुरुस्ती विधेयकात वाढीव भरपाईसोबत कायदा मोडणाऱ्यांना जबर दंड करण्यासंबंधीची तरतूदही कठोर करण्यात आली आहे.  ‘हिट अ‍ॅण्ड रन ’ प्रकरणात २ लाख, तर रस्ते अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपयाच्या भरपाईची यात तरतूद करण्यात आली आहे.  नशेत वाहन चालविल्यास १० हजार रुपये, बेदरकारपणे वाहन चालविल्यास १ ते ४ हजार रुपये, विम्याविना आणि विना हेल्मेट वाहन चालविल्यास प्रत्येकी २ हजार रुपयांच्या दंडासह तीन महिन्यांच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. मोहितेंच्या प्रयत्नांना यशमहाराष्ट्रातील मुंबई आणि ठाण्यात रस्ते अपघातांची सुनावणी विशेष न्यायालय करते. २००१ मध्ये नागपूरला अशा पाच न्यायालयांची स्थापना करण्यात आली. १८ वर्षांच्या प्रयत्नानंतर रस्ते अपघातांशी संबंधित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी विशेष लवादाची मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, असे नागपूरमधील चंद्रशेखर मोहिते यांनी सांगितले.