शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सोनियांनाही वादात खेचले

By admin | Updated: July 2, 2015 01:57 IST

आयपीएलचे वादग्रस्त माजी आयुक्त ललित मोदी यांनी आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भारतीय जनता पार्टीचे (भाजप) नेते खा.वरुण गांधी

नवी दिल्ली : आयपीएलचे वादग्रस्त माजी आयुक्त ललित मोदी यांनी आता काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भारतीय जनता पार्टीचे (भाजप) नेते खा.वरुण गांधी यांना या वादात खेचण्याचा प्रयत्न केला आहे. आपली काकू सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीने संपूर्ण प्रकरण मिटविण्यासाठी वरुण गांधी यांनी एका सौद्याचा प्रस्ताव मांडला होता,असा दावा ललित मोदी यांनी केला असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वरुण गांधी यांनी ललित मोदींना लंडनमध्ये भेटल्याचे मान्य केले मात्र हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून फेटाळला आहे. यासंदर्भातील अन्य एका टिष्ट्वटमध्ये मोदी म्हणतात, मिस्टर वरुण गांधी आपण काय बोलले होतात ते जगाला सांगा. आमचे चांगले मित्र या घटनेचे साक्षीदार असून ते जागतिक स्तरावरील नामवंत ज्योतिषी आहेत. आपण लंडनमध्ये माझ्या घरी आला होतात की नाही हे स्पष्ट करा. काही वर्षांपूर्वी लंडनमधील रिट्ज हॉटेलमध्ये थांबले असताना ज्या काकूचा उल्लेख आपण केला होता त्या सोनिया गांधी आहेत. दुसरीकडे भाजपने या टिष्ट्वटबॉम्बचा आरोपाचा वापर काँग्रेसवर लक्ष्य साधण्यासाठी करताना सोनिया गांधी यांच्याकडून याप्रकरणी स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)वरुण गांधी यांनी लंडनमध्ये भेट घेतल्याचा दावा-ललित मोदी यांना व्हिसासाठी मदत केल्याच्या आरोपामुळे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. याप्रकरणानंतर ललित मोदी यांनी सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका आणि जावई रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत लंडनभेटीचा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्याकडून एकापाठोपाठ एक टिष्ट्वटस्फोट होत असून कुणाचे नाव समोर येणार याची धास्तीच बसली आहे. या मालिकेत मोदी यांनी गांधी काकू-पुतण्यास लक्ष्य केले आहे.-वरुण गांधी काही वर्षांपूर्वी मला भेटण्यासाठी माझ्या लंडनमधील घरी आले होते. आपल्या काकूच्या (सोनिया गांधी) मदतीने संपूर्ण प्रकरण मिटविण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता आणि यासाठी इटलीतील त्यांच्या बहिणीची मी भेट घ्यावी अशी त्यांची इच्छा होती,असा दावा त्यांनी मंगळवारी रात्री टिष्ट्वटमध्ये केला आहे. -आमच्या एका मित्राने नंतर सोनिया गांधी यांच्या बहिणीशी संपर्क साधला असता त्यांनी या कामासाठी ६ कोटी डॉलर्सची (अंदाजे ३६० कोटी) मागणी केली होती, असा खळबळजनक आरोप मोदी यांनी केला आहे. -वरुण गांधी यांनी हा आरोप फेटाळताना सांगितले की, यात काहीही तथ्य नसून अशाप्रकारच्या वायफळ बडबडीला उत्तर देणे मला योग्य वाटत नाही. याप्रकरणी भाजप नेतेही वरुण यांच्या बचावात पुढे आले आहेत. दोघेही वेगवेगळ्या पक्षात असून दोन्ही कुटुंबांमध्ये कसे संबंध आहेत याची साऱ्या जगाला कल्पना आहे, असा युक्तिवाद भाजपने केला आहे. परराष्ट्रमंत्री स्वराज यांच्या पतीला दिला होता नोकरीचा प्रस्तावललित मोदींनी स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांना आपल्या कंपनीतील संचालक बोर्डात सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता, असे वृत्त खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे.या नव्या खुलाशाने विरोधक मोदी सरकारविरोधात आणखी आक्रमक झाले असून काँग्रेसच्या हाती आयते कोलित सापडले आहे. ललित मोदींनी कौशल यांना इंडोफिल या रसायन कंपनीत ‘अल्टरनेट डायरेक्टर’ बनण्याचा प्रस्ताव दिला होता. प्रस्ताव दिला होता, पण नंतर तो मागे घेतला गेलादरम्यान] सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांना संचालकपदाचा प्रस्ताव दिला असला तरी संचालक मंडळापुढे येण्यापूर्वीच माझ्या मुलाने (ललित मोदी) तो मागे घेतला होता, असे ललित मोदी यांचे वडील आणि इंडोफिल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व प्रबंध संचालक के.के. मोदी यांनी स्पष्ट केले आहे. प्रस्ताव मी नाकारला होताखुद्द स्वराज कौशल यांनी ललित मोदींच्या कंपनीकडून अल्टरनेट डायरेक्टर पदाचा प्रस्ताव मिळाल्याचे मान्य केले असले तरी, आपण हा प्रस्ताव नाकारला होता, असे स्पष्ट केले आहे.