नवी दिल्ली : आपचे आमदार सोमनाथ भारती यांनी दिल्लीचे कायदामंत्री असताना दक्षिण दिल्लीत मध्यरात्री छापा मारताना आफ्रिकन महिलेशी असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर खटला भरण्याला नायब राज्यपाल नजीब जंग यांनी परवानगी दिल्यामुळे आप सरकारविरुद्ध नव्याने संघर्ष उभा ठाकणार आहे.केजरीवाल सरकारने व्यक्त केलेले मत धुडकावत जंग यांनी खटल्याला परवानगी दिली. गतवर्षी जानेवारीत भारती यांनी घातलेला हा छापा चांगलाच गाजला होता. भारतींवर खटला भरू नये असा सल्ला दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जंग यांनी परवानगी दिल्याचे त्यांच्या कार्यालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. यापूर्वी खटल्यासाठी परवानगी आवश्यक असल्याचे न्यायालयाने पोलिसांना बजावले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
छाप्याबद्दल सोमनाथ भारतींवर खटला
By admin | Updated: August 4, 2015 23:37 IST