शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

काही लेखक पुरस्कार परत घेण्यास राजी

By admin | Updated: January 23, 2016 03:33 IST

देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावरून आपले पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची ‘नाराजी’ कमी होऊ लागली असून नयनतारा सहगल यांच्यासह अन्य

नवी दिल्ली : देशातील कथित वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावरून आपले पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची ‘नाराजी’ कमी होऊ लागली असून नयनतारा सहगल यांच्यासह अन्य काही लेखक आपले पुरस्कार पुन्हा स्वीकारण्यास तयार झाले आहेत.साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी शुक्रवारी एका वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. साहित्य अकादमीने लेखकांना त्यांचे पुरस्कार परत करणे सुरू केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांची भाची व सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांना आधीच त्यांचा पुरस्कार परत केला आहे. एक अन्य लेखक नंद भारद्वाज हेही आपला पुरस्कार परत स्वीकारण्यास राजी झाले आहे. अन्य लेखकांनाही त्यांचे पुरस्कार परत केले जातील, असे तिवारी यांनी सांगितले. लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येवर साहित्य अकादमीची चुप्पी तसेच दादरी कांडानंतर देशात कथित असहिष्णुता वाढल्याच्या निषेधार्थ सुमारे ४० लेखकांनी मोदी सरकार व साहित्य अकादमीच्या विरोधात आपले पुरस्कार परत केले होते. या ‘पुरस्कार वापसी’ने देशातील वातावरण ढवळून निघाले होते. या पार्श्वभूमीवर साहित्य अकादमीने गत २३ आॅक्टोबरला सर्वसहमतीने सरकारविरोधी निषेधाचा ठराव पारित करून राज्य व केंद्र सरकारांना अशा घटना रोखण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले होते. शिवाय लेखकांना त्यांनी परत केलेले पुरस्कार पुन्हा ग्रहण करण्याची विनंती केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)