अहमदाबाद : सौर ऊर्जेवर उडणारे जगातले एकमेव असे ‘सोलर इम्पल्स’ हे विमान जगाच्या पहिल्या भ्रमंतीवर असून मंगळवारी अहमदाबादला उतरणार आहे. ते संयुक्त अरब अमिरातच्या अबुधाबीहून उड्डाण केल्यानंतर ओमानमधील मस्कत येथे पहिला मुक्काम करेल. त्याचा दुसरा थांबा अहमदाबादला असल्याचे या विमानाच्या जनसंपर्क (पीआर) कंपनीने निवेदनात नमूद केले आहे.सोलर इम्पल्सचे वैमानिक बट्रँड पिकार्ड व आंद्रे बोर्शबर्ग हे दोन दिवस अहमदाबादमध्ये थांबण्याची शक्यता असून त्यानंतर हे विमान वाराणशीला रवाना होईल. संयुक्त अरब अमिरातमधील वाईट हवामानामुळे या स्वीस विमानाने एक दिवस विलंबाने उड्डाण केले होते. त्यामुळे त्याचे अहमदाबादमधील आगमनही विलंबाने होत आहे. गंगेवर घालणार घिरट्यास्वच्छ ऊर्जा व स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी हे विमान वाराणशीमध्ये गंगा नदीवर घिरट्या घालताना दिसेल, असे या प्रकल्पाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या विमानाची पहिली चाचणी अमेरिकेत २०१३ मध्ये पार पडली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘सोलर इम्पल्स’ आज अहमदाबादला
By admin | Updated: March 9, 2015 23:37 IST