शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मुलायमचा यू-टर्न!

By admin | Updated: January 10, 2017 01:33 IST

समाजवादी पार्टी एकसंघ असून फूट पडण्याचा प्रश्न नाही, सत्ता आल्यास अखिलेश हेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, असा ठाम

पाटणा/ नवी दिल्ली : समाजवादी पार्टी एकसंघ असून फूट पडण्याचा प्रश्न नाही, सत्ता आल्यास अखिलेश हेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, असा ठाम दावा समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुुलायम सिंह यादव यांनी केला. आमच्या दोघांत कोणताही वाद वा मतभेद नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला.माझ्या मुलाला फितविण्यामागे एक-दोन व्यक्ती आहेत. त्यामुळेच पक्षात पेच निर्माण झाला. उमेदवारांच्या फॉर्म ए आणि बी’वर माझीच सही असेल, असा ठाम दावाही मुलायमसिंह यांनी केला.अखिलेश गटाने ‘सायकल’ या चिन्हाबाबत लवकर निर्णय घेण्याचे साकडे निवडणूक आयोगाला घातले, तर मुुलायमसिंह यांनी मी समाजवादी पार्टीचा सर्वेसर्वा असल्याचा पुनरूच्चार केल्यानंतर समाजवादी पार्टीतील गटबाजी आणखी पराकोटीची सीमा गाठते की काय? अशी शक्यता निर्माण झालेली असतांना मुलायम सिंह यांनी उपरोक्त विधान केले.दुसरीकडे, सोमवारी वेगाने राजकीय हालचाली घडल्या. अखिलेश गटाने ‘सायकल’ चा वाद तातडीने निकाली काढला जावा, म्हणून निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १७ जानेवारीपासून सुरु होत असल्याचे ‘सायकल’ वादावर तातडीने निर्णय घ्यावा, असे साकडे रामगोपाल यादव यांनी निवडणूक आयोगाला घातले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार नरेश अग्रवाल आणि नीरज शेखर होते. अखिलेश सुद्धा दिल्लीला जाणार होते; परंतु, शेवटच्या क्षणी बेत रद्द केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)इवल्याशा आदिती अन् टीनाची शिष्टाई...पिता-पूत्रातील राजकीय संघर्षामुळे दुरावा निर्माण झालेला असतांना अखिलेश यांच्या दोन कन्या आदिती आणि टीना या दोघांत दिलजमाईचा ईवलासा प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी मुुलायमसिंह टीनाला चिडवत म्हणाले की, तुझे वडील (अखिलेश) खूपच जिद्दी आहेत. टीनाने लगेच हे वडीलांना कळवले. त्यावर अखिलेश जाम हसले.राज्यसभा सभापतींना पत्र...रामगोपाल यादव यांना पक्षातून व राज्यसभेतील पक्षनेते पदावरून हटविण्यात आल्याचे मुलायम यांनी सभापती हमीद अन्सारी यांना लेखी कळविले. त्यांना सभागृहातील मागच्या बाकावर आसन द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली.