शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फटाक्यांमध्ये समाजवादी रॉकेट, मायावती बॉम्ब

By admin | Updated: October 30, 2016 02:04 IST

उत्तर प्रदेशातील फटाका बाजारात यंदा समाजवादी रॉकेट आणि मायावती बॉम्बचा जोर आहे. निवडणूकपूर्व रणधुमाळीने राज्य ढवळून निघाले असताना दिवाळीचा फटाका बाजार त्याला

लखनौ : उत्तर प्रदेशातील फटाका बाजारात यंदा समाजवादी रॉकेट आणि मायावती बॉम्बचा जोर आहे. निवडणूकपूर्व रणधुमाळीने राज्य ढवळून निघाले असताना दिवाळीचा फटाका बाजार त्याला अपवाद कसा ठरेल? हा बाजारही राजकीय दारूगोळा ठासून भरलेल्या फटाक्यांनी सजला आहे. ‘समाजवादी रॉकेट’च्या पाकिटावर सपाप्रमुख मुलायमसिंह यादव यांचे छायाचित्र असून, ते अमरसिंह यांना मिठाई भरवत आहेत. सपात सुरू असलेल्या धुमश्चक्रीला अमरसिंह जबाबदार असल्याचे पक्षाचा एक गट मानतो. फटाका बाजारात बसपाप्रमुख मायावतीही मागे नाहीत. फटाका निर्मात्यांनी त्यांच्या नावाचा बॉम्ब बाजारात आणला असून, त्यावर मायावतींचे चित्र आहे. हा बॉम्ब निवडणुकीत वाजतो की, फुसका ठरतो हे समजण्यास वेळ असला तरी सध्या या बॉम्बला बाजारात मागणी आहे हे नक्की. ‘अखिलेश की लड़ी अनलिमिटेड’ नावाचाही एक फटाका असून तोदेखील बाजारात लोकप्रिय ठरला आहे. हा फटाका म्हणजे एक हजार छोट्या फटाक्यांची लड आहे. या लडीच्या पाकिटावर लोकप्रिय मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या युवकांसोबतचा फोटो आहे. चांगली मागणी२०१७ मधील निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या फटाक्यांना चांगली मागणी असून, युवकांसह नेतेमंडळीही आवडीने हे फटाके खरेदी करीत आहेत, असे हजरतगंज येथील एका फटाका विक्रेत्याने सांगितले. समाजवादी पक्षातील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याच्या पार्श्वभूमीवर मुलायम यांचे कुटुंब यंदाची दिवाळी एकत्रितपणे साजरी करील की नाही याबाबत चर्चा झडत आहे. होळी आणि दिवाळीच्या वेळी संपूर्ण मुलायम कुटुंब सैफई येथे एकत्र येते. विवाह, साखरपुडा आणि घरभरणी, अशा कार्यक्रमांवेळी कुटुंबातील सर्व लोक एकत्र येतात.