शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर मुद्यावर सोशल मीडिया

By admin | Updated: February 10, 2016 01:18 IST

रा.स्व. संघाने अयोध्या मुद्यावर सोशल मीडियातून संदेश देण्यासाठी २५० स्वयंसेवकांना खास प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. ‘राममंदिर एक वास्तव’ (राममंदिर ए रिअ‍ॅलिटी)

नवी दिल्ली : रा.स्व. संघाने अयोध्या मुद्यावर सोशल मीडियातून संदेश देण्यासाठी २५० स्वयंसेवकांना खास प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. ‘राममंदिर एक वास्तव’ (राममंदिर ए रिअ‍ॅलिटी) या शीषर्काखाली २० फेब्रुवारी रोजी सोशल मीडिया सत्र आयोजित करण्यात येत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी राममंदिर मुद्यावर संदेश देण्यासाठी केलेल्या आवाहनाची ही परिणती असल्याचे संघाच्या एका नेत्याने सांगितले. संघाने सोशल मीडियाचा वापर करणे ही नवी बाब राहिलेली नाही. यापूर्वीही असहिष्णुता आणि कलम ३७० सारख्या मुद्यांवर संघाने चर्चा घडवून आणलेली आहे. अलीकडेच संघाने नोंदणी अर्ज वितरित केले असून, त्यात वापर करीत असलेल्या फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉटस् अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाचा उल्लेख अनिवार्य केला होता. टिष्ट्वटरवर फॉलोअर्स जास्त असलेल्यांसाठी खास सत्र आयोजित करण्यात येणार असून, त्यात न्यायालयाचा आदेश, पुरातत्व विभागाने (एएसआय) लावलेला शोध, अयोध्या हे प्रभूरामांचे जन्मस्थळ असल्याची मुस्लिमांनी दिलेली कबुली आणि अन्य तथ्यांची माहितीही देण्यात आली आहे. अशा प्रकाराची माहिती टिष्ट्वटरवर दिली गेल्यास लोकांना वास्तव कळून येईल, असे संघाला वाटते. संघाच्या मोहिमेत यापूर्वीच हजारावर स्वयंसेवकांनी नोंदणी केली असली तरी त्यापैकी केवळ २५० जणांची निवड केली जाणार आहे.अपप्रचाराला प्रत्युत्तरसोशल मीडियावर राममंदिराबाबत केल्या जाणाऱ्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी ही मोहीम असल्याचे रा.स्व. संघाच्या सूत्रांनी सांगितले.