शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

लहान असो वा मोठे सर्वांचाच भ्रष्टाचार घातक

By admin | Updated: May 7, 2014 03:24 IST

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा राबविताना ज्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार आहे असा अधिकारी खालच्या पदावर आहे की वरिष्ठ पदावर हा निकष पूर्णपणे गैरलागू ठरतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

 सुप्रीम कोर्टाची सरकारला चपराक : कायदा राबविताना अधिकार्‍यांची वर्गवारी चुकच

नवी दिल्ली: देशातील भ्रष्टाचाराच्या कुप्रवृतीविरुद्ध प्रभावीपणे लढण्यासाठी संसदेने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा केलेला आहे. त्यामुळे हा कायदा राबविताना ज्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार आहे असा अधिकारी खालच्या पदावर आहे की वरिष्ठ पदावर हा निकष पूर्णपणे गैरलागू ठरतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. न्यायालय म्हणते की, सरकारी अधिकारी खालच्या पदावरील असो अथवा वरिष्ठ पदावरील, त्याने केलेल्या भ्रष्टाचाराने संपूर्ण शासन यंत्रणाच भ्रष्ट होत असते. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधी कायदा राबविताना अधिकार्‍यांची त्यांच्या हुद्द्यानुरुप वर्गवारी करणे सर्वस्वी चुकीचे आहे. भ्रष्टाचार हा देशाचा शत्रू आहे व भ्रष्टाचार करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांना हुडकून काढून त्यांना दंडित करणे हाच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे अधिकार्‍यांचे असे असमर्थनीय वर्गीकरण कायद्याच्या कठोरतेस बाधा आणणारे आहे. पूर्वसंमती घेण्याच्या या बंधनातील आणखी एका दोषावर बोट ठेवताना घटनापीठाने म्हटले की, संशयीत आरोपीला सुगावाही लागणार नाही अशा पद्धतीने तपास करून माहिती गोळा करणे हे चातुर्याने केल्या जाणार्‍या पोलिसी तपासाचे खरे इंगीत असते. पण प्राथमिक तपासासाठीही सरकारची पूर्वसंमती घेण्याच्या या बंधनाने संबंधित अधिकार्‍यांना होऊ घातलेल्या चौकशीची आधीच कुणकुण लागून सारवासारव करण्याचा त्यांना अवधी मिळतो. शिवाय करण्यात आलेल्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य आहे की नाही याचीही शहानिशा सीबीआयला करू न देणे ही फौजदारी कायद्याने दिलेल्या स्वतंत्र व नि:पक्ष तपासाच्या अधिकारावर गदा आहे. शिवाय राज्य सरकारच्या पोलिसांवर असे बंधन नाही. हेच अधिकारी जेव्हा राज्य सरकारच्या सेवेत असतात तेव्हा त्यांच्याविरुद्धच्या तक्रारींची तेथील पोलीस विनासंमती चौकशी करू शकतात. मग एकट्या सीबीआयवर असे बंधन घालणे हा पक्षपात आहे, असेही न्यायालयाने म्हटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

एकदा फटकारले तरी पुन्हा तेच

> ४वर्ष २००३ मध्ये कायदा दुरुस्ती करून हे कलम कायद्यात अंतर्भूत केले जाण्यापूर्वी केंद्र सरकारच्या प्रशासकीय निर्देशांच्या स्वरूपात हेच बंधन सीबीआयला लागू होते. त्यास ‘सिंगल डायरेक्टिव्ह’ असे म्हटले जायचे.

>विनीत नारायण यांनी केलेल्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने डिसेंबर १९९७ मध्ये ते घटनाबाह्य ठरवून रद्द केले. तरी सरकारने पुन्हा कायद्याच्या स्वरूपात पुन्हा हेच बंधन सीबीआयवर लादले.

>विनीत नारायण प्रकरणात जो बचाव फेटाळला गेला होता तोच बचाव आताही सरकारने केला.