शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र जाधवांसह सहा राज्यसभेवर

By admin | Updated: April 23, 2016 04:29 IST

प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, आॅलिम्पिक पदकविजेती खेळाडू मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी

नवी दिल्ली : प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, आॅलिम्पिक पदकविजेती खेळाडू मेरी कोम, माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू, ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता, मल्याळम चित्रपट अभिनेते सुरेश गोपी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नियुक्ती केली आहे. राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त १० पैकी सात सदस्यांच्या जागा रिक्त झाल्याने त्यापैकी सहा जागांवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. सातव्या जागेसाठी विविध नावांची चर्चा सुरू असून त्या जागेसाठी स्पर्धा आहे.सात सदस्यांच्या निवृत्तीनंतर तिथे कोणाच्या नियुक्ती होणार, यावर गेले काही दिवस दिल्लीत तर्कवितर्कांना उधाण आले होते. इंडिया टीव्हीचे रजत शर्मा, झी टीव्हीचे सुभाषचंद्र आणि ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान यांच्या नावांची चर्चा सुरू होती. मात्र पक्षामध्ये एकमत न झाल्यामुळे सातव्या जागेवर नियुक्ती करण्यात आलेली नाही. सुब्रमण्यम स्वामी व डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह होता. डॉ. जाधव हे अर्थतज्ज्ञ असून, ते नियोजन आयोगावर होते. डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सल्लागार समितीवरही होते. त्यांच्यामार्फत दलित समाजाला पक्षाजवळ आणण्याची भाजपाची इच्छा आहे. स्वपन दासगुप्ता यांच्या नियुक्तीसाठी अर्थमंत्री अरुण जेटली प्रयत्नशील होते. लोकसभा निवडणुकीत अमृतसर मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीच प्रयत्न केला.ईशान्येकडील सात राज्यांत तसेच केरळमध्ये येत्या काळात पाय रोवण्याचे भाजपा जोरदार प्रयत्न करणार आहे. त्यादृष्टीने पावले पडायला सुरुवात झाली असून, मेरी कोम आणि मल्याळम अभिनेते सुरेश गोपी यांची नियुक्ती त्याचाच भाग आहे. राष्ट्रपती नियुक्त १0 सदस्यांपैकी दोन खासदार गेल्या नोव्हेंबरमध्ये, तर पाच सदस्य २ एप्रिल रोजी निवृत्त झाले. उरलेले तिघे सदस्य २0१८ साली निवृत्त होत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)