शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श नगरातील सहा घरे पाण्यात भिंत फोडून काढले पाणी : रात्रभर जागरण, कमरेपर्यंत पाण्याने उडविली झोप

By admin | Updated: June 25, 2016 23:04 IST

जळगाव : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच दमदार पावसाने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पाडले. शहरातील आदर्शनगरभागात सहा घरांना मोठा फटका बसून घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांना रात्रभर जागरण करीत पाणी काढावे लागले. पाण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने अखेर भिंतीला छिद्र पाडून पाणी काढण्याची वेळ या नागरिकांवर आली.

जळगाव : शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या यंदाच्या पावसाळ्यातील पहिल्याच दमदार पावसाने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पाडले. शहरातील आदर्शनगरभागात सहा घरांना मोठा फटका बसून घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांना रात्रभर जागरण करीत पाणी काढावे लागले. पाण्याचे प्रमाण वाढतच गेल्याने अखेर भिंतीला छिद्र पाडून पाणी काढण्याची वेळ या नागरिकांवर आली.
आदर्श नगर भागात रुस्तमजी स्कूलच्या शेजारी असलेल्या मुंदडा प्लॉटमधील शिव अपार्टमेंट या भागामध्ये सहा घरे आहेत. शुक्रवारी रात्री पाऊस सुरु झाल्यानंतर या भागाच्या वरील परिसरातील पाण्याचा प्रवाह येथे आल्याने व त्यात नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात पाणी जमा झाले. त्यानंतर पाण्याला जायला जागा नसल्याने हे पाणी थेट या सहा घरांच्या कुंपणामध्ये व त्यानंतर ते सहाही घरांमध्ये शिरले. कंुपणामध्ये कमरेपर्यंत पाणी जमा झाल्याने पाणी काढावे कसे असा प्रश्न या नागरिकांसमोर उभा राहिला. त्यात घरातही पाण्याची पातळी वाढू लागल्याने अखेर प्रताप चव्हाण यांनी कुंपणाच्या बाहेर जाऊन भिंतीला छिद्र पाडले व पाणी वाहते केले. त्यानंतर घरातील पाणी काढण्यासाठी रात्री एक वाजेपासून ते पहाटे चार वाजेपर्यंत रहिवाशांना जागरण करावे लागले.
आदर्श नगरातील साधना देशकर, सुधाकर देशपांडे, विद्याधर जोशी, सिंधूबाई साठे, प्रताप चव्हाण, रवींद्र मिश्रा यांच्या घरामध्ये पाणी शिरले. या सहाही घरांमधील सोफा, फर्निचर व इतर साहित्य पाण्यात सापडून ओले झाले तसेच कोणाची पाण्याची मोटार, छोटी चक्की यांचेही नुकसान झाले. रात्री नगरसेवक पृथ्वीराज चव्हाण हे तेथे थांबून होते.

या भागातही फटका....
-समतानगरमध्ये एका घरात पाणी शिरल्याने घरात चिखलही साचला होता.
- इच्छादेवी मंदिरात शिरले पाणी
- प्रेमनगरात वीज तारांवर झाडाची फांदी पडल्याने वीज पुरवठा खंडित
- बजरंग पूल पाण्याखाली
- श्रीधर नगर जवळील नाल्याचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने वाघ नगरचा पहाटेपर्यंत संपर्क तुटला
-बजरंग पूल ते एसएमआयटी महाविद्यालय परिसराचाही पहाटेपर्यंत संपर्क तुटला.