शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांचे हाल कायम, पैसे असूनही रुग्ण देत होती मृत्यूशी झुंज

By admin | Updated: November 11, 2016 10:32 IST

केवळ जुन्या नोटा असल्याने एका पक्षाघाताच्या रुग्णाला तातडीने उपचार मिळू शकले नाहीत, नवी दिल्लीतील ही घटना आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा हद्दपार करण्यासाठी मंगळवारी 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ जुन्या नोटा असल्याने एका पक्षाघाताच्या रुग्णाला (Stroke) तातडीने उपचार मिळू शकले नाहीत.  चीड आणणारी ही घटना घडली आहे राजधानी नवी दिल्लीमध्ये.
 
45 वर्षांच्या मुनीश धनकर या विधवा असून त्या उत्तर प्रदेशातील बागपत येथील राहणा-या आहेत. बुधवारी त्यांना दोनदा पक्षाघाताचा त्रास झाला, यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी वेळ न घालवता उपचारांसाठी त्यांना घेऊन दिल्लीमध्ये दाखल झाले.
मुनीश यांच्या उपचारांसाठी नातेवाईक आणि मित्रांकडून उधार घेऊन पैशांची जमवाजमव करण्यात आली.  मात्र, पैसे असतानाही उपचारांमध्ये समस्या निर्माण होईल,  याची फुसटशीही कल्पना मुनीश यांच्या कुटुंबीयांना नाही. 
 
मुनीश यांना रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास खासगी हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. दुस-या दिवशी सकाळी त्यांचे यकृत काम करत नसल्याने प्रत्यारोपणासाठी 30 लाख रुपयांचा खर्च येईल, असे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती त्यांचा पुतण्या विपिन कुमारने दिली. आम्ही इतका खर्च करू शकत नसल्याने आम्ही डॉक्टरांकडे डिस्चार्जसाठी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची विनंती केली, असेही कुमारने सांगितले.
 
मात्र हॉस्पिटल प्रशासनाने डिस्चार्जआधी 1.70 लाख रुपयांचे बिल भरण्यास सांगितले. हे बिल भरण्यासाठी आम्ही तयारही होतो, मात्र हॉस्पिटलने जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. चेकची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला तब्बल सहा तास लागले, तोपर्यंत काकी मृत्यूशी झुंज देत होती. हा संघर्ष इथेच संपला नाही तर, आमच्या समोरील समस्या रात्री उशीरापर्यंत कायम होत्या. 
 
रात्री जवळपास 9 वाजेपर्यंत, 'लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटल'मधील आयसीयूमध्ये जागा मिळवण्यासाठी आम्हाला बराच संघर्ष करावा लागला. नोटांच्या गोंधळामुळे अशाच प्रकारचा त्रास अन्य रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनाही सहन करावा लागला. रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत असतानाही,संपूर्ण सहकार्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा हॉस्पिटलकडून करण्यात येत आहे.