शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कृउबात उतराई,खेचाई थांबली शुकशुकाट : हमालीची ३५ टक्के दरवाढीची मागणी

By admin | Updated: January 21, 2016 00:04 IST

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल व मापाडी बांधवांनी बेमुदत काम बंद केल्यामुळे मार्केट भागातील उतराई, खेचाईचे कामे बुधवारी बंद होती. हमाल बांधव ३५ टक्के दरवाढीवर ठाम असल्याने कृउबामध्ये शुकशुकाट होता.

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल व मापाडी बांधवांनी बेमुदत काम बंद केल्यामुळे मार्केट भागातील उतराई, खेचाईचे कामे बुधवारी बंद होती. हमाल बांधव ३५ टक्के दरवाढीवर ठाम असल्याने कृउबामध्ये शुकशुकाट होता.
तीन महिन्यांपूर्वी संपला करार
कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डात व्यापारी असोसिएशनमार्फत खरेदीदाराकडून भाववाढीचा करार करण्यात येतो. त्याची मुदत नोव्हेंबर २०१५ मध्ये संपली आहे. या संदर्भात जळगाव जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटनेकडून दोन वेळा व्यापारी असोसिएशनसोबत पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर संघटनेची व व्यापारी असोसिएशनची बैठक झाली. मात्र त्यात भाववाढीबाबत निर्णय झाला नाही.
व्यापारी असोसिएशन २० टक्के भाववाढीसाठी तयार
दोन वर्षांपूर्वी झालेल्या करारानुसार हमाल व मापाडी बांधवांना ३५ टक्के भाववाढ देण्यात आली होती. त्यानुसार यावर्षीदेखील ३५ टक्के वाढ द्यावी अशी जिल्हा माथाडी व जनरल कामगार संघटनेची मागणी आहे. मात्र व्यापारी असोसिएशनकडून केवळ २० टक्के दरवाढ देण्याबाबत सहमती दर्शविली आहे. व्यापारी व हमालमापाडी यांच्यातील चर्चा फिस्कटल्यामुळे हमाल बांधवांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
४० आडत दुकानांवर शुकशुकाट
हमाल व मापाडी संघटनेच्या सदस्यांनी बेमुदत बंद पुकारल्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समिती भागात असलेल्या ४० आडत दुकानांवरील खेचाई, उतराई, भराई यासारखी कामे बंद होती. सर्व हमाल बांधव कृउबाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मोकळ्या जागी बसलेेले होते. प्रारंभी दुपारी १२ वाजता हमाल बांधवांनी या ठिकाणी आपल्या मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष कॉमेश सपकाळे, शरद चौधरी, तुकाराम गर्जे, गफूर मामू, सुकदेव शेळके, आदिनाथ जयकर, अंबादास भटोळे, विष्णु पवणे, डिगंबर साबदे उपस्थित होते.