शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बिहारच्या पूरस्थितीसाठी पुन्हा फराक्का बॅरेजच्या नावाने ओरड; जलसंपदा मंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 06:18 IST

एका परिसंवादात याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, बॅरेजच्या सदाेष रचनेमुळे बक्सरच्या जवळील भागातील नदीपात्रात माेठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या मार्गातील सर्व परिसराला पुराचा तडाखा बसताे.

पाटणा :बिहारमध्ये दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीसाठी राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी बांगलादेशसाेबत गंगा नदीच्या पाणीवाटपाचा करार आणि फराक्का बॅरेजच्या चुकीच्या रचनेला दाेषी ठरविले आहे. बिहारला पावसाळ्यात दरवर्षी भीषण पुराचा तडाखा बसताे. त्यानंतर वर्षभर दुष्काळी स्थिती निर्माण हाेते. याचे खापर जलसंपदा मंत्री संजयकुमार झा यांनी फराक्का बॅरेजवर फाेडले आहे. (Shout again in the name of Farakka Barrage for Bihar flood situation water resources minister commented on it)

एका परिसंवादात याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, बॅरेजच्या सदाेष रचनेमुळे बक्सरच्या जवळील भागातील नदीपात्रात माेठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या मार्गातील सर्व परिसराला पुराचा तडाखा बसताे. पावसाळ्यानंतर नदीपात्रात १४०० क्युसेक एवढा विसर्ग हाेणे आवश्यक आहे. मात्र, ताे केवळ ४०० क्युसेक एवढाच राहताे. त्यामुळे राज्याला पुरेसे पाणी उपलब्ध हाेत नाही, असे झा म्हणाले.

प्रत्येक शेतापर्यंत पाणी पाेहाेचविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांमध्ये बिहारमध्ये पंजाब आणि हरयाणाप्रमाणे हरितक्रांती झालेली दिसून येईल, असे झा म्हणाले.

सातत्याने ओरडपश्चिम बंगालच्या मुर्शीदाबाद जिल्ह्यात गंगा नदीवर फराक्का बॅरेज उभारण्यात आले आहे. त्याचे काम १९७५ मध्ये पूर्ण झाले. बॅरेजमुळे गंगा नदीच्या प्रवाहावर नियंत्रण मिळवून माेठ्या परिसराला पाणीपुरवठा करण्याचा हेतू हाेता. मात्र, त्यावर बांगलादेशने आक्षेप घेतला हाेता. प्रत्यक्षात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर नदीचा गाळ वाहून नेण्यासाठी पुरेसा प्रवाह नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे बिहारमध्ये सातत्याने पूरस्थिती निर्माण हाेते, अशी ओरड नेहमी हाेते. 

टॅग्स :BiharबिहारfloodपूरBangladeshबांगलादेश