शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

‘महाराष्ट्र सदन’ प्रकरणामुळे शिवसेनेची कोंडी

By admin | Updated: July 24, 2014 02:43 IST

सदनाच्या उपाहारगृह व्यवस्थापकांच्या तोंडात घास कोंबण्याचा केलेल्या बेदरकार प्रयत्नाचे अत्यंत तीव्र पडसाद गुरूवारी सर्वत्र उमटले.

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनाच्या ढिसाळ व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करताना  विवेक गमावलेल्या शिवसेना खासदारांनी रमजानचा उपवास ठेवणा:या सदनाच्या उपाहारगृह व्यवस्थापकांच्या तोंडात घास कोंबण्याचा केलेल्या बेदरकार  प्रयत्नाचे अत्यंत तीव्र पडसाद गुरूवारी सर्वत्र उमटले. 
सदनाच्या व्यवस्थापकांची तडकाफडकी बदली  करण्यात आली, तर या प्रकरणाची उपाहारगृह चालविणा:या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)ने दोन सदस्यांची चौकशी समिती नेमली. समितीचा अहवाल चार दिवसांत येईल.
तिकडे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि शिवसेनेच्या खासदारांवर कारवाईची मागणी केली. शिवसेनेच्या खासदारांनी तेवढय़ाच आक्रमकतेने विरोध करीत आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न केला.  लोकसभेत काँग्रेस खासदार शाहनवाज यांनी मुद्दा उपस्थित केला. रमजान सुरू असताना शिवसेना खासदाराने जे केले ते राज्यघटनेच्या मूळ भावनेविरुद्ध आहे, असे ते म्हणाले. त्याच्या समर्थनार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डाव्या पक्षांच्या सदस्यांनी प्रचंड गोंधळ सुरू केला.  गिते यांच्या खोटे बोलणो या शब्दावरून पुन्हा गदारोळ झाला. लोकसभा अध्यक्षांनी खोटे हा शब्द कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले तर गिते यांनी त्याऐवजी असत्य शब्दाचा प्रयोग केला. त्यामुळे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष समोरासमोर आल्याने कामकाज तहकूब करावे लागले. कामकाज सुरू झाल्यानंतर सरकारतर्फे संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी माफी मागितली. तसेच विधूडी यांनी आपल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला; परंतु काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्र महाजन यांना पत्र लिहून विधुडी यांच्यावर कारवाईची मागणी केली. 
राज्यसभेत संयुक्त जनता दलाचे अली अनवर अन्सारी यांनी शून्यतासात मुद्दा उपस्थित केला. 
 
17 जुलै रोजी सदनाच्या दुर्दशेविषयी दुपारी बारा वाजता शिवसेना नेते खा. संजय राऊत व सचिव खा. अनिल देसाई यांच्या नेतृत्वात आनंदराव अडसूळ, राजन विचारे, रवींद्र सावंत, हेमंत गोडसे,कृपाल तुमाने,रवींद्र गायकवाड, विनायक राऊत, शिवाजीराव आढळराव पाटील, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे या 12 खासदारांनी  सदन गाठले होते. जवळपास तीन तास हे सारेच सदनात होते. सदनातील नळांतून दूषित पाणी येते, आंघोळ केल्यावर पाण्याचा दर्प कायम असतो, उपाहारगृहात जेवणाचा दर्जा अत्यंत सुमार आहे. महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण सांगूनही दिले जात नाही. कोणतीही ऑर्डर केल्यावर तासभर वेळ लागतो,पाण्याच्या बाटल्या पुन्हा वापरल्या जातात,महाराष्ट्रातील खासदारांना साध्या खोल्या व भाजपाचे उत्तर प्रदेशातील खासदार सत्यपालसिंग यांची शाही व्यवस्था का, राज्यातील खासदारांनी अन्य राज्याच्या सदनात राहायला देत नाहीत व सिंग यांना मंत्र्याच्या समकक्ष असलेला कक्ष कसा दिला गेला, असे प्रश्न त्यांचे सदनाच्या प्रशासनाकडे होते. त्यांनी सोबत निवेदनही आणले होते. 
या खासदारांनी उपाहारगृहाच्या स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला. तिथे त्यांनी जेवणाची पाहणी केली. उपहारगृहाच्या समोरच्या हॉलमध्ये भोजनाची व्यवस्था आहे. तिथे एका कोप:यात भिंतीला लागून पदार्थाची भांडी टेबलावर ठेवली आहेत. ती त्यांनी पाहिली.खासदार भाज्या व पोळ्य़ा व अन्य पदार्थांची तपासणी करत असल्याने तिथे असलेले वेटर्स व उपाहारगृह व्यवस्थापक सय्यद अर्शद झुबेर तिथे होते. 
 
 
खासदारांनी तेथील वेटर्सला व स्वयंपाक्यांना असे भोजन बनविले जाते का, असे प्रश्न विचारले. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी एक पोळी हाती घेतली ती तोडण्याचा प्रयत्न केला मात्र ती तुटतच नव्हती. तेवढय़ात ठाण्याचे खासदार राजन विचारे तिथे आले, त्यांनी भाजी बघितली तिला सुगंध नव्हता. त्यामुळे त्यांनी भाजी कशी केली जाते ते स्वयंपाक्यांना सांगितले. त्याचवेळी अर्शद झुबेर यांनी त्यांना पोळ्यांबाबत चौकशी केली. त्या कशी बनविल्या जातात, ते सांगत असतानाच विचारे यांनी अर्शदच्या तोंडात कच्ची पोळी कोंबण्याचा जोरदार प्रयत्न केला. वारंवार त्यांनी हा प्रयत्न केला; मात्र त्यावेळी अर्शद मागेमागे सरकत होते. त्याने आपला रोजा सुरू आहे, आपण खाऊच शकत नाही, असे म्हटल्यावर विचारे यांच्या पायाखालील जमीन सरकली. त्यांनी तेथून काढता पाय घेतला. तुमाने यांनी हा प्रकार इतर खासदारांना सांगितले, की उपाहारगृहातून बाहेर जाऊ, आपण महाराष्ट्राचे दिल्लीतील निवासी आयुक्त बिपीन मलिक यांना याबाबत जाब विचारू
असे म्हटले.
 
अन् तडकाफडकी बदली झाली
सोमवारी आंदोलन करण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. मात्र सोमवारी आंदोलनाची जागा चर्चेने घेतली होती. मंगळवारही शांतच गेला. बुधवारी या खासदारांनी सकाळी साडेनऊ वाजता सदन गाठले, तेव्हा कार्यालये सुरू व्हायची होती. 
सदनाचे माजी व्यवस्थापक नितीन गायकवाड यांना निवासी आयुक्त मलिक यांना भेटायचे आहे, असे सांगितले. मात्र चर्चेसाठी संसदेतील शिवसेना कार्यालयात दुपारी एक वाजता या, असे सांगितले. त्यानंतर हे खासदार संसदेत कार्यालयात अधिका:यांची वाट बघत बसले. 
सुमारे अर्धातास उशिरा अतिरिक्त निवासी आयुक्त समीर सहाय व माजी व्यवस्थापक नितीन गायकवाड हे चर्चेला आले. त्यांनी दोन दिवसांत सुधारणा होतील असे सांगितले. 
बुधवारी रात्री मलिक यांनी व्यवस्थापक सुहास ममदापूरकर यांना सत्यपालसिंग यांची शाही व्यवस्था का, त्याचे 24 तासांत उत्तर द्या, अशी नोटीस बजावली. ममदापूरकर यांनी मार्गदर्शक तत्त्वानुसार उत्तरासाठी मुदत वाढवून मागताच त्यांची रात्री नऊ वाजता मुंबईला बदली करण्यात आली. त्यांची जागा आता गायकवाड सांभाऴत आहेत.  
 
आढळरावांचे पत्र, राऊतांकडे बैठक
सदनातील दुर्दशेवर लक्ष वेधणारे पहिले पत्र खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवासी आयुक्तांना दिले होते. त्यात त्यांनी सत्यपालसिंग यांच्या निवासाची मुद्दाही उपस्थित केला होता. विशेष असे, की संसदेच्या शिवसेना कार्यालयात जेव्हा सदनाच्या अधिका:यांसोबत चर्चा झाली तेव्हा आढळराव पाटील गैरहजर होते. शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी येण्यास असहमती दाखवली. खा. भावना गवळी त्या बैठकीत कमालीच्या संतप्त झाल्या होत्या.
4गवळी यांनी  सदनातील गैरकारभारासह तेथील अनैतिक गोष्टींचाही उल्लेख करून काही अधिका:यांची नावे घेऊन आरोप केले होते. मुळात, आढळराव पाटील यांनी सत्यपालसिंग प्रकरणी पत्र दिल्यावर तीन दिवसांनी कोणतीच हालचाल सदनाकडून होत नसल्याने संजय राऊत यांनी खासदारांना जेवायला बोलविले होते. तेव्हा हा विषय निघाला आणि चर्चा करू, आंदोलन करू व सदनाची व्यवस्था सुधारू असे ठरले होते. 
 
खासदारांनी सहा दिवस वाचला तक्रारींचा पाढा..
निवेदन घेऊन निवासी आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले, तेव्हा ते तिथे नव्हते. ते विमानतळावर राज्याचे मुख्य सचिव ज.स. सहारिया यांना आणण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना या आंदोलनाची माहिती दिली गेली. तेव्हा त्यांनी आजारी असल्याचे सांगून सदनात येण्याचे टाळले. खासदारांनी नंतर सहारिया यांची भेट घेतली. त्याच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचल्यावर, आंदोलन सोमवार्पयत (दि. 21) पुढे ढकलले.
संतप्त झालेल्या अनिल देसाई यांनी निवासी आयुक्तांच्या कार्यालयातील घडय़ाळ फोडले, भिंतीवर निषेधाच्या घोषणा लिहिल्या. घोषणांची पत्रकेही लावली. सदनाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी असून, योग्य दखल घेऊ, सोमवार्पयत सुधारणा झालेल्या दिसतील असे सहारिया यांनी त्यांना  सांगितले होते. मात्र त्या दिवसांपासून आजतागायत गेली सहा दिवस मलिक हे शिवसेना खासदारांना भेटण्याचे टाळत आहेत. 
आंदोलनानंतर लागलीच  उपाहारगृह चालविणा:या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)चा कंत्रट रद्द करण्यात आला होता. याचदरम्यान आपल्यासोबत खासदारांची कशी वर्तणूक होती ते उपाहारगृह व्यवस्थापक अर्शद झुबेर यांनी आयआरसीटीसीचे उपमहा व्यवस्थापक शंकर मल्होत्र याना 17 जुलै रोजी रात्री सांगितले. तर, मल्होत्र  यांनी त्याच रात्री बिपीन मलिक यांनी झालेली घटना कळविली होती.
 
ठाकरेंच्या दौ:यामुळे आंदोलन तहकूब
मंगळवारी हे खासदार आंदोलन करण्याच्या पवित्र्यात होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या महिन्यात येत असल्याने वादळे नकोत म्हणून, आंदोलनाचा पिच्छा शिवसेनेने सोडला होता.
सत्यपालसिंग सदनातच
ज्या खासदाराच्या वास्तव्यामुळे हे प्रकरण रंगले ते भाजपाचे उत्तर प्रदेशचे खा.सत्यपालसिंग महाराष्ट्र सदनातील 154 क्रमांकाच्या कक्षात मुक्कामी आहेत. तर गेल्या काही दिवसांत आणखी तीन उत्तर प्रदेशातील खासदारांनी सदनात बस्तान मांडले आहे.
 
जाणीवपूर्वक सामाजिक शांतता बिघडावी म्हणून बिपीन मलिक यांनीहे प्रकरण सहा दिवसांनंतर उकरले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू. 
- अनिल देसाई
 
सरकार खासदारामागे आठ हजार रूपये महिना सदनालादेत असते. मात्रतेथील दुर्दशा कोणालाच का दिसत नाही.
 - आनंदराव अडसूळ
 
मी शिवसेनेसोबत आहे. या प्रकरणात कुठल्याच खासदाराची चूक नाही. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाची व्यवस्था भयंकर आहे.
- रामदास आठवले
 
सदनातील असुविधा, तेथील  भ्रष्टाचार लपविण्या साठी धार्मिक रंग दिला जात आहे. शिवसेना इतक्या खालच्या दर्जाचे राजकारण करत नाही.
- संजय राऊत
 
कुणाच्या कपाळावर तो       कोणत्या धर्माचा वा जातीचा आहे, हे थोडीच लिहिले असते. 
- कृपाल तुमाने
 
प्रकरणाची चौकशी करून यात दोषी असलेल्या खासदारांवर गुन्हे दाखल करा -  
- आमदार अकबरुद्दीन ओवैसी 
 
शिवसेना खासदारांची कृती अत्यंत निषेधार्ह आहे. संबंधितांनी बिनशर्त माफी मागावी अन्यथा केंद्राने कारवाई करावी.
- नसीम खान, अल्पसंख्यक विकासमंत्री
 
सरकारने तात्काळ कारवाई करीत संबंधित खासदारांना अटक करावी.
-मायावती,
अध्यक्ष, बसपा
 
सदनात घडलेला हा प्रकार धार्मिक श्रद्धेवर हल्ल्यासारखा आहे. 
-नितीशकुमार,
जदयूचे वरिष्ठ नेते
 
गैरमुस्लिम व्यक्तीने जरी रमजानचे रोजा ठेवल्यास त्याच्या इच्छेविरुद्ध खाण्यास बाध्य करण्याचा कुणालाही अधिकार नाही.
-मेहबुबा मुफ्ती
 
ही घटना सर्व धर्माचा सन्मान करणा:या राज्यघटनेचा अपमान करणारी आहे. सेनेच्या खासदारांविरुद्ध कारवाई व्हायला हवी. 
     - अली अनवर