छत्रपती पुतळ्यासाठी शिवजयंतीदिनी उपोषण
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
श्रीरामपूर : अनेकदा आंदोलने करूनही व पुढार्यांनी आश्वासने देऊनही श्रीरामपूरच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवजयंतीदिनी (१९ फेब्रुवारी) गांधी चौकात उपोषण करण्यात येणार आहे.
छत्रपती पुतळ्यासाठी शिवजयंतीदिनी उपोषण
श्रीरामपूर : अनेकदा आंदोलने करूनही व पुढार्यांनी आश्वासने देऊनही श्रीरामपूरच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जात नसल्याच्या निषेधार्थ शिवजयंतीदिनी (१९ फेब्रुवारी) गांधी चौकात उपोषण करण्यात येणार आहे.अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश सरचिटणीस कृषिराज टकले यांनी शनिवारी ही माहिती दिली. या पुतळ्यासाठी काँग्रेससह भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा आश्वासने दिली. युती सरकार सत्तेवर आल्यास पुतळा उभारण्याचे जाहीर करण्यात आले. पण हे आश्वासन मृगजळ ठरत आहे. श्रीरामपूर तालुका शिवाजी महाराज पुतळा सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करून १९ फेब्रुवारीपासून जनजागृतीस सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत व सोसायट्यांचे ठराव श्रीरामपूर तालुक्यातून मागविण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संघर्षासाठी शिवप्रेमींनी सज्ज व्हावे, असे आवाहन संघाचे पदाधिकारी सुभाष गागरे, सुनील कोळसे, राजेंद्र सावंत, नितीन कसार, अनिल थोरात, रावसाहेब बढे, सागर मुठे आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)